Mumbai News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : गांधीगीरी जिंदाबाद! SRAने भाडे थकवले, पठ्ठ्याकडून मुन्नाभाई स्टाईल आंदोलन, कार्यालयातच कपडे काढले

Mumbai Ghatkopar News : मुंबईच्या एसआरए कार्यालयात पठ्ठ्याने मुन्नाभाई स्टाईल आंदोलन केले. या पठ्ठ्याने कार्यालयातच कपडे काढले. त्यानंतर एकच गोंधळ झाला.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईत झोपडीधारकांना एसआरएच्या माध्यमातून खासगी विकासकाकडून पुनर्विकासामध्ये इमारतीत घर दिले जाते. मात्र मुंबईच्या अनेक एसआरए प्रकल्पात आजही हजारो नागरिक घर आणि भाड्यापासून वंचित आहेत. घाटकोपरमधील अशाच एका पुनर्विकास प्रकल्पात 2018 पासून पात्र ठरवूनही झोपडीधारकाला विकासक डागा यांनी भाडे दिलेच नाही. याशिवाय सदनिका देखील दिली नाही. या विरोधात झोपडीधारकाने वारंवार एसआरए कार्यालयात पत्र व्यवहार देखील केला. मात्र त्यांच्या पत्राला कायमच केराची टोपली दाखवण्यात आली.

अखेरीस 5 जून रोजी झोपडीधारकाने समाजसेवक संदीप वैद यांना सोबत घेऊन एसआरएमध्ये धाव घेतली. यावेळी समाजसेवक वैद यांनी एसआरए कार्यालयात थेट स्वतःची कपडे उतरवत मुन्नाभाई स्टाईल आंदोलन केले. मात्र वैद यांच्या या अचानक केलेल्या कृतीमुळे एसआरए कार्यालयात एकच गोंधळ एसआरएतील अधिकारी आणि सुरक्षा रक्षक यांनी वैद यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र वैद्यांनी सुरक्षारक्षकांना जुमानता पीडित झोपडीधारकांच्या अन्याय विरोधात आवाज उचलला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपर पंतनगर परिसरामध्ये खासगी विकासक डागा यांच्यामार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवली जात आहे. या योजनेत 2018 मध्ये पात्र ठरलेल्या रामेश्वर धनराज गुप्ता या व्यक्तीला विकासकांकडून एकही रुपयांचे भाडे मिळाले नाही. शिवाय पुनर्वसन योजनेतील सदनिका देखील मिळाली नाही. 2018 पासून गुप्ता हे बेघर झाले आहेत. याविषयी गुप्ता यांनी अनेकदा विकासक डागा यांच्या विरोधात एसआरए कार्यालयात तक्रारी देखील केल्या. मात्र गुप्ता यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली. शेवटी गुप्ता यांनी समाजसेवक संदीप वैद यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडून न्याय मिळवून देण्याची विनंती केली. यामुळे वैद यांनी गुप्ता यांच्यासोबत एसआरए कार्यालयात अनेकदा अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. आश्वासनापलीकडे गुप्ता यांना काहीही मिळाले नाही.

शेवटी पाच जून रोजी गुप्ता यांनी समाजसेवक वैद यांना सोबत घेऊन एसआरएतील अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र एसआरएमधील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात येताच समाजसेवक वैद यांनी एसआरए कार्यालयात अनोखे आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले . वैद यांनी एसआरएतील अधिकाऱ्यांसमोरच स्वतःची कपडे काढून अर्ध नग्न होऊन आंदोलन केले. यामुळे एसआरए कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वैद यांना एसआरए कार्यालयातील सुरक्षारक्षकांनी या कृतीपासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला न जुमानता वैद यांनी अर्ध नग्न होऊन आंदोलन केले.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी देखील वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात देखील मास्टर लिस्टमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांवर देखील म्हाडाकडून अन्याय होत असल्याची तक्रार एका समाजसेवी महिलेकडे आली होती. त्या समाजसेविका महिलेने देखील म्हाडा अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन पैसे उधळून पैशांचा पाऊस पाडला होता. त्याशिवाय अधिकाऱ्याच्या दरवाज्याला देखील नोटांचा हार घालून आंदोलन करून रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

SCROLL FOR NEXT