मावळच्या तुंगमध्ये जमिनीला भेग; माळीणची पुनरावृत्ती टळली...(पहा व्हिडीओ) दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

मावळच्या तुंगमध्ये जमिनीला भेग; माळीणची पुनरावृत्ती टळली...(पहा व्हिडीओ)

मावळ मध्ये पाच दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तुंग मध्ये भूस्खलन झाले आहे.

दिलीप कांबळे

दिलीप कांबळे

मावळ : मावळ Maval मध्ये पाच दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तुंग मध्ये भूस्खलन झाले आहे. तुंग Tung किल्ल्याच्या पायथ्याच्या तुंग गावालगत सुमारे तीनशे मीटर लांब भूस्खलन झाल्यामुळे घरावर दरड कोसळून घर जमीनदोस्त झाले आहे.

तुंग गावचे रहिवाशी सीताराम पठारे यांचे घर व‌ किराणा दुकान जवळच शंभर मीटर अंतरावर आहे. सकाळी घरातील सर्व माणसे भात लावणी साठी शेतात गेली होती. पाठारे हे एकटेच दुकानात होते पाऊस जास्त असल्याने दुकानात ग्राहक नसल्याने सकाळी अकरा वाजता ते गावात फेरफटका मारायला गेले. काही मिटर अंतरावर गेले असता मागे जोरदार आवाज झाला परत येऊन पाहतात तर राहते घर व दुकान पुरे जमिनदोस्त झाले.

त्यांच्या घरावर दरड कोसळून होत्याचे नव्हते झाले. अन त्यांना आश्रू आनावर झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली परंतु परिस्थिती अशी होती की तिथे काहीच बाहेर काढू शकत नाही. त्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धीर देण्यापलीकडे काहीच उपयोग झाला नाही.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Old Is Gold उमेदवारीचा भाजपचा फाॅर्म्युला ठरला, त्या नगरसेवकांना पुन्हा संधी|VIDEO

Karjat Tourism : ट्रेकिंग अन् हायकिंगसाठी कर्जतजवळील भन्नाट लोकेशन, न्यू इयर वीकेंड 'येथे' प्लान करा

Shocking: कुत्र्याची हत्या, सशाचे मटण सांगून गावभर विकले; खाताच गावकऱ्यांची प्रकृती खालावली, तरुणाने असं का केलं?

Coconut Truffles: न्यू इयर करा स्पेशल! लहान मुलांसाठी बनवा झटपट टेस्टी आणि हेल्दी नारळाचे ट्रफल; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये प्रथमच मनसे-महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकत्र

SCROLL FOR NEXT