SpiceJet aircraft's tyre bursts Saam Tv
मुंबई/पुणे

SpiceJet: मोठा अनर्थ टळला! लॅंडींग करताना विमानाचं टायर फुटलं; सुदैवाने सर्वजण सुरक्षित

SpiceJet aircraft's tyre bursts on landing in Mumbai: स्पाईसजेट कंपनीचं बोईंग ७२७-८०० हे विमान सोमवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान दिल्लीहून मुंबईकडे निघाले होते.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) काल, सोमवारी मोठा अनर्थ टळला आहे. स्पाईसजेट (SpiceJet) कंपनीचं विमान दुर्घटनाग्रस्त होता होता वाचलं आहे. मुंबई विमानतळावर लॅंडिंग करताना (उतरत असताना) या विमानाचं टायर (चाक) फुटलं, त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने असं काही झालं नाही. विमानाने सुरक्षितपणे लँडिंग केलं आणि विमानातील सर्व प्रवाशी तसेच क्रु मेंबर्स हे सुरक्षित आहेत. (SpiceJet plane Accident News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार स्पाईसजेट कंपनीचं बोईंग ७२७-८०० (SpiceJet Boeing 737-800) हे विमान सोमवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान दिल्लीहून मुंबईकडे निघाले होते. सोमवारीच सकाळी नऊ वाजता हे विमान मुख्य रनवे २७ वर उतरले होते. हे विमान उतरल्यानंतर तपासणी केली असता या विमानाचे टायर हा पंक्चर आणि फाटलेले आढळून आले. या घटनेनंतर मुख्य धावपट्टी तपासणीसाठी बंद करावी लागली.

घटनेनंतर दोन विमानांच्या लँडिंगला उशीर

विमानाचे टायर फुटल्याची माहिती मिळताच विमानतळावर अलर्ट जाहीर करण्यात आला. या घटनेनंतर मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी तपासणीसाठी काही काळ बंद ठेवावी लागली. त्यामुळे दोन विमानांचे लँडिंग होण्यास विलंब झाला. या घटनेबाबत स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमान धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरले. लँडिंगवर, धावपट्टी साफ करत असताना, एक टायर दोषपूर्ण आढळला. धूर वैगरे दिसला नाही. हे विमान नेमून दिलेल्या पार्किंमध्ये उभे होते. लँडिंग दरम्यान पायलटला कोणतीही असामान्यता जाणवली नाही, आणि प्रवाशीही नेहमीप्रमाणे उतरले.

यापूर्वीही घडल्या आहेत अनेक घटना -

- २१ ऑगस्टला कोलकाता विमानतळावरील क्रॉसवाइंडमुळे संध्याकाळी ५ ते ६.३० वाजेपर्यंत उतरणारी विमानं हवेत फिरत राहिली.

- १२ ऑगस्टला बेंगळुरू ते माले (मालदीव) गो फर्स्ट फ्लाइटचे कोईम्बतूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. याचे कारण इंजिनमध्ये काही बिघाड असल्याचे सांगण्यात आले.

- ५ ऑगस्टला वाराणसीमध्ये एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या विमानावर पक्षी आदळला होता.

- ४ ऑगस्टला GoFirst एअरलाइन्सच्या विमानाने चंदीगडसाठी उड्डाण केले. अहमदाबाद विमानतळावर पक्ष्याला धडकल्याने त्यांचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

- १९ जून रोजी पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाच्या इंजिनला आग लागली. विमानात १८४ प्रवासी होते.

स्पाइसजेट वाढवणार व्यवसाय

दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणखी दोन B737 विमानांची नोंदणी रद्द करण्याची शक्यता आहे, जी सध्या स्पाइसजेटसोबत कार्यरत आहेत. त्याचवेळी समोर येत असलेल्या माहितीनुसार, स्पाइसजेट आपला व्यवसाय वाढवणार आहे. या संदर्भात, कंपनीने बाहेरील पार्टी आणि इतर विमान कंपन्यांकडून निधी उभारण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, कंपनीने आपल्या ताफ्यात ७ नवीन बोईंग विमाने समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती कंपनीचे मालक अजय सिंग यांनी यापूर्वीच दिली होती.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

SCROLL FOR NEXT