Mumbai New Coastal Road: 100 Km Project, 2 Tunnels And 5 Interchanges saam tv
मुंबई/पुणे

South Mumbai to Palghar: १००किमी लांबी,२ भुयारी मार्ग,५ इंटरचेंज; असा असणार मुंबईचा नवा 'कोस्टल रोड'

New Coastal Road to Connect South Mumbai to Palghar : मुंबईला दक्षिण मुंबईशी पालघरला जोडणारा १०० किमी लांबीचा नवीन किनारी मार्ग (कोस्टल रोड) मिळणार आहे. ३८,००० कोटी रुपयांच्या या प्रस्तावित प्रकल्पात दोन भूमिगत बोगदे आणि पाच इंटरचेंज असतील.

Bharat Jadhav

मुंबईला आणखी एक कोस्टल रोड मिळणार आहे. उत्तन विरार मार्ग समुद्राऐवजी सरकार आता आणखी एक कोस्टल रोड तयार करणार आहे. या मार्गामुळे दक्षिण मुंबईहून थेट पालघरपर्यंत विनाथांबा पोहोचता येणार आहे. आधी समुद्रातून उभारण्यात येणाऱ्या सी लिंकसाठी तब्बल ५८ हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याने तो आर्थिकदृष्ट्या परवडणार नव्हता. त्यामुळे आता हा मार्ग समुद्राला लागून हा रोड तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च ३८ हजार कोटी रुपयांपर्यंत खाली आलाय.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पाच्या दोन सुधारित आराखड्यांचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर करण्यात आले. मरीन ड्राइव्ह ते पालघर अशा १०० किमीहून अधिक लांबीच्या कोस्टल कॉरिडॉरची उभारणी करून मुंबईची थेट वाढवण बंदराला जोडला जाणार आहे. त्याचा भाग असलेला उत्तन ते विरार मार्ग आधी सी लिंक स्वरूपात उभारला जाणार होता. केंद्र सरकारकडून निधी मिळण्यात अडचणी येत होत्या. परिणामी हा कोस्टल रोड उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता हाकोस्टल रोड उभारण्यात येणार आहे.

विरार भागात दोन भुयारी मार्ग, पाच इंटरचेंज

प्रकल्पात दोन भुयारी मार्ग असणार आहेत. यात विरार भागात मोठी लोकवस्ती आहे. त्यामुळे रहिवासी भागाजवळ हा एक भुयारी मार्ग असेन. तर दुसरा भुयारी मार्ग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाखालून जाणार आहे. तसेच मार्गावर वसई, विरार, उत्तन आदी रहिवासी भागात प्रवेश करण्यासाठी आणि महामार्गावर जाण्यासाठी पाच इंटरचेंज प्रस्तावित असणार आहे.

प्रकल्पाचे दोन प्रस्ताव?

प्रकल्पातील पहिल्या प्रस्तावात हा मार्ग समुद्राला लागून नेण्याचा विचार आहे. तसेच हा मार्ग प्रत्येक दिशेच्या वाहतुकीसाठी तीन लेनचा उभारण्यात येणार आहे. त्यातून प्रकल्पाचा खर्च ३८ हजार कोटी रुपये येणार आहे. त्यात बांधकामे कमी प्रमाणात बाधित होतील. तर दुसऱ्या प्रस्तावात हा मार्ग प्रस्तावित डीपी रोडवरून नेण्याचा विचार आहे.

मात्र या डीपी रोडच्या भागात अतिक्रमणे असून ती काढणे अवघड ठरू शकते. प्रकल्पाच्या निधीसाठीही आता एमएमआरडीए विविध पर्याय तपासणार आहे. त्यामध्ये सार्वजनिक खासगी भागीदारीतून महामार्ग उभारला जाऊ शकतो का? याचीही तपासणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Mega Block: रविवारी बाहेर पडण्याआधी रेल्वेचं वेळापत्रक बघा! 'या' मार्गांवर लोकलच्या फेऱ्या रद्द

पुष्कर मेळ्यात मध्य प्रदेशच्या ‘काळा बादल’ची चर्चा; अवघ्या २० महिन्यांत वजन ७६० किलो

Maharashtra News Live Update: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट घेतली

लोकसभेच्या तयारीसाठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन! पुण्यात बड्या नेत्यांची खलबतं,राहुल गांधींकडे जाणार महाराष्ट्राचा रिपोर्ट

ठाकरे सेनेच्या नगरसेवकाकडून महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण

SCROLL FOR NEXT