Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Saam TV
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal: ...आणि छगन भुजबळांनी घातली भाजपची टोपी (पहा Video)

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस OBC आरक्षणाच्या मुद्यावरुन चांगलाच तापला आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांच्या वेळखाऊपणामुळे कोर्टाने अहवाल फेटाळल्याचा आरोप केला तसंच. OBC आरक्षणावर चर्चा झाली पाहिजे अशी आमची मागणीही फडणवीस यांनी केली. मात्र सरकारला ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन घेरण्याची भाजपने (BJP) चांगलीच रणनिती आखली होती.

भाजपच्या सर्व नेत्यांनी आज येताना "ओबीसी बचाव" असं लिहलेल्या टोप्या घातल्या होत्या शिवाय ओबीसी आरक्षणच्या मुद्यावर विरोधकांनी अधिवेशनात जोरदार घोषणाबाजी देखील केली. ओबीसी आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारचा धिक्कार असो असे फलक झळकवत विरोधक घोषणा देत होते.

पहा व्हिडीओ -

म्हणून मी लगेचच टोपी घातली -

दरम्यान, या सगळ्या प्रकरणावरती सरकारतर्फे छगन भुजबळ बोलत होते ते म्हणाले, काही नगरपालिका ओव्हरड्यू झाल्या. मात्र, एकही ZP ओव्हरड्यू झाली नाही. आपण भाजपकडील काही लोकं आणि आमच्याकडे एक-दोन लोकं मिळून यावर काम करु, काही गोष्टी राहिल्याचं मीही मान्य केल्या आहेत तसंच आपण सुप्रीम कोर्टाचा आदर करतो. आता आपण सभागृहात एकमेकांवर चिखलफेक आणि उणीदुणी न काढता ओबीसी आरक्षणासाठी एक आहोत, हे देशाला दाखवून देऊ असं भुजबळ म्हणाले.

हे सांगतानाच भुजबळ यांनी आपणही भाजपच्या लोकांनी घातलेली टोपी का घातली हे सांगितलं. 'देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) काल OBC बाबतीत कोर्टात काय झालं त्यावर आपलं मत मांडलं. त्याचं मी स्वागत करतो. OBC च्या पाठीमागे आपण मजबुतीनं उभे आहात, ही चांगली बाब आहे आणि म्हणूनच मी भाजपच्या एका भगिनीनं मला जी "ओबीसी वाचवा" लिहलेली टोपी दिली ती मी लगेच घातली.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Lok Sabha: 'मी राजकारणातली सासू, अर्जुन खोतकर माझी सून'; जालन्यात रावसाहेब दानवेंची मिश्किल टिप्पणी

EPFO Rules : EPF अकाउंटवर मिळतो ५०,००० रुपयांचा फायदा; EPFO चा 'हा' नियम तुम्हाला माहितीच नसेल

Buldhana: पळशी झाशी गावात अघोरी विद्येचा प्रकार, पाणी पिण्यास ग्रामस्थांमध्ये भीती, नेमकं काय घडलं?

MI vs SRH,IPL 2024: वानखेडेवर आज मुंबई- हैदराबाद भिडणार! पाहा प्लेइंग ११, पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

Shirpur News : गुटख्याची अवैध वाहतूक; २८ लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT