Ulhasnagar Police अजय दुधाणे
मुंबई/पुणे

एकाच रात्री सहा दुकानाची चोरी प्रकरण; तिघांना अटक

अवघ्या 24 तासात आरोपींना अटक केल्याने व्यापाऱ्यांनी उल्हासनगर पोलिसांचे कौतुक केले.

अजय दुधाणे

उल्हासनगर - शनिवारी रात्री जपानी बाजार येथील सहा दुकानाची शटर तोडून चोरी करणाऱ्या तीन जणांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या 24 तासात आरोपींना अटक केल्याने व्यापाऱ्यांनी उल्हासनगर (Ulhasnagar) पोलिसांचे (Police) कौतुक केले. शनिवारी रात्री चार वाजण्याच्या सुमारास कॅम्प 2 मधील नेहरू चौक जवळील जपानी बाजार मध्ये गोपाल खत्री यांचे सरकारी शॉप नं. ६९ आहे. त्यांच्या शेजारी कमल पारवाणी यांचे अगरबत्तीचे व संजय यांचे फुट वेअरचे दुकान आहे.

हे देखील पहा -

या परिसरातील ५ ते ६ दुकानांचे शटर उचकटून अज्ञात चोरटयांनी चार हजार रूपये रोख रक्कम चोरून नेले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हरकत मध्ये आले. त्यानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज मिळविले. बातमीदारांमार्फत संशयीत आरोपीची माहिती मिळवत सापळा रचुन सचिन उर्फ सच्या त्रंबक अंबोरे, मदन किसन तुपे, अमन विनोद गुप्ता यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. अटक आरोपीतांची पोलीस कोठडी घेवून त्यांनी आणखीन गुन्हे केले आहेत काय याचा सखोल तपास केला जाईल, अशी माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT