Siddhivinayak Darshan Saam Tv
मुंबई/पुणे

Siddhivinayak Darshan: भाविकांसाठी खुशखबर! सिद्धिविनायकला जाणं झालं सोपं, दर पाच मिनिटांनी फक्त ५ रुपयांत बससेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Siddhivinayak To Dadar Best Bus Ticket

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक (Siddhivinayak) मंदिरात नेहमीच गर्दी असते. सणावाराच्या दिवसांत तर प्रचंड वर्दळ असते. अशा वेळी भाविक रिक्षा, टॅक्सी करून मंदिरात जातात. यावेळी त्यांची मोठी लूट होते. त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात. पण आता यावर वचक बसणार आहे, कारण बेस्टने भाविकांना मोठा दिलासा दिला आहे. (Latest Marathi News)

प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता आरामात दर्शन घेता येणार (Siddhivinayak Darshan) आहे. दादर स्थानक ते मंदिर यादरम्यान कोणतेही थांबे नसलेली बस सेवा सुरू केली आहे. सिद्धविनायक दादर बससेवा पुन्हा सुरू झाली. यामुळे भाविक खूश आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केव्हा असणार बस

श्री सिद्धिविनायक दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दादर पश्चिमहुन दर पाच मिनिटांनी एसी मिनी बस सोडण्यात येणार आहे. यासाठी दादर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या भाविकांना बेस्टच्या मिनी बसेसच्या रांगेत उभं राहावं (Siddhivinayak to dadar Best bus) लागेल. त्या दर पाच मिनिटांनी भाविकांना मिळणार आहे. प्रत्येक प्रवासासाठी ५ रुपये मोजावे लागतील. धार्मिक सण आणि नवीन वर्षात सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी गर्दी असते, याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅक्सी चालकांना बससेवेचा फटका

दादर स्थानकापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी भरमसाठ पैसे आकारून प्रवाशांची पळवापळवी करणाऱ्या टॅक्सी चालकांना या बससेवेचा (Best bus) मोठा फटका बसणार आहे. बहुतेक टॅक्सी चालक भाडे मीटरचा वापर करून प्रवास करण्यास सहमत नसायचे. ते जास्त भाडे आकारत होते. यावर आता आळा बसणार आहे. या एकेरी प्रवासासाठी 5 रुपये प्रति तिकीट (Siddhivinayak to dadar bus ticket) निश्चित करण्यात आले आहेत, असं उपमहापालिका आयुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितलं आहे.

अतिक्रमणविरोधी मोहीम राबविणार

सिद्धिविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमणही हटवण्यात येणार (Siddhivinayak to dadar bus) आहे. तसंच फुल विक्रेत्यांना स्थलांतरित करण्यात येणार आहे.

विक्रेत्यांना स्थलांतरित केल्यानंतर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते सुशोभित केले जातील. तसेच, त्यापूर्वी अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात येईल, असंही उपमहापालिका आयुक्त रमाकांत बिरादार यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

SCROLL FOR NEXT