shreyas iyer  twitter
मुंबई/पुणे

Shreyas iyer : श्रेयस अय्यरने मुंबईत खरेदी केली कमर्शियल प्रॉपर्टी; किंमत आहे कोट्यवधींच्या घरात

Shreyas Iyer Buys Commercial Property: श्रेयस अय्यरने मुंबईत कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केली आहे. श्रेय्यसने खरेदी केलेल्या मालमत्तेची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

Vishal Gangurde

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत २.९ कोटींची संपत्ती खरेदी केली आहे. यामुळे श्रेयस अय्यरचा समावेश मुंबईत व्यावसायिक मालमत्ता खरेदी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत झाला आहे. अय्यरने १६ जुलै या मालमत्तेसाठी व्यवहार केला आहे.

श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीच्या आदर्शनगरमधील गोदावरी इंडस्ट्रियल सीएचएसएल इमारतीत ही व्यावसायिक मालमत्ता खरेदी केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, श्रेयस अय्यरने सप्टेंबर २०२० साली द वर्ल्ड टॉवर्सच्या ४८ व्या मजल्यावर २३८० फूटांचं घर विकत घेतलं होतं. श्रेयसने प्रॉपर्टी खरेदी केल्यानंतर जोरदार चर्चा झाली होती. दरम्यान, श्रेयस अय्यरने बऱ्याच वेळेनंतर भारतीय संघात पदार्पण केलं आहे.

श्रेयस अय्यरने मागील आयपीएल सिझनमध्ये चांगली कामगिरी केली होती. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात त्याच्या संघाने स्पर्धा जिंकली होती. श्रेयस अय्यर आता २ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसणार आहे.

२ ऑगस्ट रोजी सुरु होणाऱ्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत सहभागी होण्यापूर्वी काही खेळाडू सराव करताना दिसले. तीन सामन्यांची मालिका प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. पहिला सामना २ ऑगस्ट, दुसरा सामना ४ ऑगस्ट आणि तिसरा सामना ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

२ ऑगस्ट रोजी सुरु होणाऱ्या एकदिवसीय वनडे सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू सराव करणार आहे. तिन्ही वनडे सामने हे प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या सामना २ ऑगस्ट, दुसरा सामना ४ ऑगस्ट आणि तिसरा सामना ७ ऑगस्ट रोजी होणार असल्याने या मालिकेकडे साऱ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT