Pune Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: 'सिग्नलवर नाही तर मा‍झ्या तोंडावर लघु शंका ..', पोराच्या घाणेरड्या कृत्यावर बाप संतापला

Shastrinagar youth misconduct:'तो माझा मुलगा आहे, याची मला लाज वाटते. माझ्या मुलानं सिग्नलवर लघु शंका केली नाही तर, माझ्या तोंडावर केली आहे' अशा शब्दात तरूणाच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील शास्त्रीनगरमध्ये एका तरूणाचा लघुशंका आणि अश्लील चाळे करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर परिसरात संतपाची लाट उसळली आहे. या तरूणाची ओळख पटली असून, त्याचे वडिल हॉटेल व्यवसायिक आहेत. गौरव मनोज अहुजा असे तरूणाचे नाव असून, त्याच्या वडिलांचे नाव मनोज रमेश अहुजा आहे. या प्रकरणाबाबत तरूणाच्या वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

'तो माझा मुलगा आहे, याची मला लाज वाटते. व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे. माझ्या मुलानं सिग्नलवर लघु शंका केली नाही तर, माझ्या तोंडावर केली आहे', अशा शब्दात त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

तरूणाच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

'तो माझा मुलगा आहे, याची मला लाज वाटते. या घटनेनंतर मला पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे, ती माझ्या नावावर आहे. माझ्या मुलाचे नाव गौरव मनोज अहुजा तर, माझे नाव मनोज अहुजा आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल, ती मला मान्य आहे', असं तरूणाच्या वडिलांनी म्हटलं आहे.

तरूणाचा फोन सकाळपासून बंद आहे. त्याचे पालक देखील तरूणाचा शोध घेत असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं. घडलेल्या घटनेबद्दल तरूणाच्या वडिलांनी पोलिसांसमोर खंत देखील व्यक्त केली आहे.

पोलीस काय म्हणाले?

येरवडा येथील घटनेच्या संबधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ⁠अश्लील वर्तन करणे, सार्वजनिक वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ⁠येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ⁠

संबंधित तरुणाला शेधण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. ⁠संबंधित तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यानंतर त्याने मद्यपान केले होते की नाही हे स्पष्ट होईल, असे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT