Kalyan Biker Falls into Open Road Pit Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: रस्त्याच्या मधोमध खोदकाम, ठेकेदाराचा निष्काळजीपणा; दुचाकीस्वार थेट खड्ड्यात; पाहा VIDEO

Biker Falls into Open Road Pit: रस्त्यावर खोदण्यात आलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. याचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली जात आहे.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याणमध्ये रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव धोक्यात आला. दुचाकीस्वार थेट खड्ड्यात पडला. पण सुदैवाने तो बचावला. कल्याण पश्चिम रोहिदास वाडा परिसरातील ही घटना आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा, अशी मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम रोहिदास वाडा परिसरात रस्त्यालगत चेंबरचे काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराने १५ दिवसांपूर्वी खड्डे खोदून ठेवलेत. मात्र अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे त्याचप्रमाणे या कामाच्या आजूबाजूला कुठेही बॅरिगेटिंग केलेले नाही. आज सकाळच्या सुमारास एक दुचाकीस्वार यारस्त्यावरून घसरला आणि तो थेट दुचाकीसह खड्ड्यात पडला. सुदैवाने त्याला किरकोळ दुखापत झाली.

मात्र या घटनेमुळे ठेकेदाराचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला असून केडीएमसीने अशा बेजबाबदार ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे. कल्याण -डोंबिवली महानगरपालिकेत अनेक ठिकाणी रस्ते आणि चेंबरची काम सुरू असून या कामांसाठी अनेक ठिकाणी खोदकामे करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

कल्याण -डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांना खोदकामे करण्यात आलेल्या ठिकाणी तसंच कामे सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी ताकीद देण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही ठेकेदाराचा बेजबाबदारपणा सुरूच असल्याचे आजच्या या घटनेतून दिसून आले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्र सरकारनं आणली EDLI योजना, थेट ७ लाखांचा मोफत विमा अन्...; पाहा नेमकी योजना काय?

Veen Doghantali Hi Tutena : स्वानंदीचा अपमान करणाऱ्या सुष्मिताला समरनं खडसावलं, मालिकेत नवा ट्विस्ट | VIDEO

Gold Rate Today : आठवड्याच्या शेवटी सोने -चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी ५००० रुपयांनी घसरली; सोन्याचे दर काय? वाचा

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Eyebrow Hair Loss: भुवयांचे केस विरळ होतायत? शरीर देत असलेल्या गंभीर आजारांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT