Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: उच्चशिक्षित तरुणीला इंटरव्यूसाठी बोलावलं अन्... धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

या घटनेने मोठी खळबळ उधळी आहे.

Shivani Tichkule

Pune Crime News Today: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कौटुंबिक कलह, अनैतिक संबंध,महिलांवरील अत्याचार या सारख्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. (Latest Marathi News)

त्यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये उच्चशिक्षित २८ वर्ष तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उधळी आहे.

बी.कॉमचे शिक्षण घेतलेल्या २८ वर्षीय तरुणीला नोकरी निमित्त इंटरव्यूसाठी बोलावलं. त्यानंतर बळजबरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश्वर रेड्डी, चिरागउद्दीन शेख, नूरजहाँ शेख आणि अर्जुन ठाकरे यांच्या विरोधात बलात्काराचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

२८ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पिंपरी आणि पुण्यात तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिंपरी पोलिसांकडून गुन्हा लष्कर पोलिसांकडे गुन्हा वर्ग करण्यात आलाय. (Pune Crime)

पश्चिम बंगाल येथील २८ वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात होती. ऑनलाइनद्वारे नोकरी शोधत असताना एका तरुणीचा तिला नंबर मिळाला. तिच्याशी पीडित तरुणीने संपर्क केला. संबंधित मुलीने पुण्यातील (Pune) हिंजवडीत पीडितेला इंटरव्यूसाठी बोलवण्यात आलं.

विश्वासाने ती पुण्यात आली. मात्र हा सगळा प्रकार घडल्या नंतर अखेर तरुणीने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर पुणे शहरातील लष्कर पोलिसांकडे (Police) वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : ४ दिवसापूर्वी साखरपुडा आज काळाने घात केला; धाराशिवमध्ये अक्षय-अक्षयाचा मृत्यू

Vijay and Rashmika: लग्नाची तयारी जोरदार सुरु...; विजय देवरकोंडा अन् रश्मिका मंदान्ना उदयपुरला निघाले , पाहा VIDEO

Bigg Boss Marathi 6 : टोळी फुटली; रुचिताचा खरा चेहरा रोशनसमोर आला, पाहा धक्कादायक VIDEO

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये महिलांचा तुफान राडा

Solapur Crime : "जीव होता तो माझा..." विवाहितेने आयुष्याचा दोर कापला, हातावर मन सुन्न करणारा मजकूर अन्...

SCROLL FOR NEXT