Pune Hinjewadi Crime 
मुंबई/पुणे

हिंजवडीत खळबळ! संशयाच्या वादातून सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा मृत्यू; प्रियकर अटकेत

Pune Hinjewadi Crime : पुण्यातील हिंजवडीमध्ये संशयाच्या वादातून २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर कोमल डहाळे हिचा मृत्यू झाला. प्रियकर शुभम कालबांडे याने मारहाण केल्याचा आरोप असून, हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नेमकी घटना काय घडली? जाणून घ्या सविस्तर.

Namdeo Kumbhar

गोपाळ मोटघरे, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

पुण्यातील हिंजवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, संशयाच्या वादातून एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

कोमल डहाळे (२७) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून, ती हिंजवडीतील एका आयटी कंपनीत काम करत होती. आरोपी शुभम ज्ञानेश्वर कालबांडे हादेखील सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. दोघांची काही वर्षांपूर्वी ओळख झाली आणि त्यातून प्रेमसंबंध जुळले. दोघांच्या लग्नाला कुटुंबीयांचीही संमती होती. ते हिंजवडीतील एका पीजीमध्ये राहत होते.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून शुभमचे दुसरीकडे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. रविवारी रात्रीही याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद टोकाला गेल्यानंतर संतापलेल्या शुभमने कोमलला डोक्यावर आणि गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कोमलचा मृत्यू झाला.

कोमलचा फोन बंद असल्याने तिच्या आईने पुण्यात राहणाऱ्या नातेवाइकाला (भाच्याला) पीजीवर पाठवले होते. दुसरीकडे, सकाळी शुभमनेच पोलिसांना या घटनेची माहिती दिल्याचेही सांगितले जात आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कोमलला रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी शुभमला ताब्यात घेऊन अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पडीक जमिनी सरकारी होणार का? महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं उत्तर; म्हणाले, 'कुळ कायद्यांतर्गत...'

Tomato Juice vs Orange Juice: संत्र की टोमॅटो? ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी कोणता ज्यूस सकाळी पिणं फायदेशीर

Shaktipeeth Mahamarg: शक्तीपीठविरोधात शेतकरी आक्रमक, मॅपिंगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण; काम बंद पाडलं, VIDEO व्हायरल

Women Health After 30 : वयाच्या तिशीत महिलांना १० आजारांचा धोका; ५ टेस्ट नक्की करा, गंभीर समस्यांचे वेळीच होईल निदान

Cheese Cake Recipe: बेकरीसारखा मऊ, क्रीमी आणि चविष्ट चीज केक घरी बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT