धक्कादायक : बदनामी करतो म्हणून मित्राची जमिनीवर डोके आपटून हत्या!
धक्कादायक : बदनामी करतो म्हणून मित्राची जमिनीवर डोके आपटून हत्या! अजय दुधाने
मुंबई/पुणे

धक्कादायक : बदनामी करतो म्हणून मित्राची जमिनीवर डोके आपटून हत्या!

अजय दुधाने

उल्हासनगर : उल्हासनगर मध्ये किरकोळ वादातून एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. मयत व्यक्तीचे डोके जमिनीवर आपटून जबर मारहाण केल्याने जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांनी मिळताच आरोपीला अटक करण्यात आली.

हे देखील पहा :

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील मराठा सेक्शन परिसरात ओळखीचा मित्राने किरकोळ वादातून हत्या केल्याची घटना समोर आलीय. माझी बदनामी तू करतो याचा राग मनात धरून आरोपीने मित्राचे डोके जमीनीवर आपटले व डोक्याला जबर मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

ह्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तासातच आरोपी किरण म्हात्रे यास अटक करण्यात आल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

Maharashtra Politics 2024 : पवारांनी गल्ली ते दिल्लीपर्यंत फोडला घाम; पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वासाठी संघर्ष

Baramati Politics: विधानसभेतही बारामतीत महाभारत, अजित पवार यांना पुतण्या युगेंद्र देणार आव्हान?

SCROLL FOR NEXT