Pune Crime Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यातील हृदय पिळवटणारी घटना, चिमूरडीचा गळा दाबून खड्ड्यात फेकण्याचा भयंकर प्रकार

Uruli Kanchan Pune Crime: उरुळी कांचन जवळ असणाऱ्या नायगावमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. शेजाऱ्यांकडून चिमूरडीचा गळा दाबून मुलीला बेदम मारहाण करण्यात आले.

Dhanshri Shintre

उरुळी कांचन जवळ असणाऱ्या नायगावमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे शेजारी राहणाऱ्या सात वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण करुन रुमालाने गळा दाबुन मुलीला खड्ड्यात फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याच्या उरुळी कांचन जवळ असणाऱ्या नायगावमध्ये हा धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. अशा अनेक अत्याचाराच्या घटनांमझ्ये वाढ होताना दिसून येत आहे.

मुलीचे आई-वडील रुग्णालयात गेले होते. मुलगी एकटीच घरी होती. नेहमीप्रमाणे मुलगी सायंकाळच्या दरम्यान शेजारीच्या पोल्ट्री फार्म येथे मुलांसोबत खेळण्यासाठी गेली होती. पण त्या ठिकाणचे मुले गावी गेली होते. त्यावेळी आरोपी सुखदेव जग्गनाथ याने मुलीला खाण्याचे आमिष दाखवुन राहत्या खोलीत घेऊन गेला. त्याने मुलीला मारहाण करण्यास चालु केले.

परिसरात कोणी नसल्याने त्या नराधमाने मुलीला जीवे मारण्याच्या उद्देशाने मुलीचा गळा रुमालाने आवळून खड्ड्यात फेकून दिले. मुलगी खड्यातुन बाहेर आली. त्यावेळी मुलगी घाबरलेल्या अवस्थेत होती आणि पुर्ण चिखलानी माखलेली होती. घरी आल्यावर घाबरत तीने घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि नंतर मुलीला कुंजीरवाडीतील सरकारी दवाखान्यात तिला नेण्यात आले.

पुढील उपचार करण्याकरिता सात वर्षाच्या मुलीला ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्या आरोपीने ज्या चिमुकलीला मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला, ती मुलगी आणि हा आरोपी हे एकाच समाजातले आहेत. ते दोघेही एकमेकांना ओळखत होते. आरोपीला पत्नी असून त्याला दोन मुलं आहे. दरम्यान याबाबतची तक्रार पिडीत मुलीच्या पालकांनी पोलिसांत केली आहे. त्या तक्रारावरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT