Pune News  representative image
मुंबई/पुणे

Pune News : स्वारगेट डेपोतून बसमध्ये तरुणी आरोपीसोबत गेली कशी? अखेर प्रश्नाचं उत्तर आलं समोर! बसचालकाचा धक्कादायक खुलासा

Pune Latest news : पुण्यातील घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. स्वारगेटमधील संतापजनक घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. आता या शिवशाही बसच्या चालकाने वरिष्ठांंना जबाब दिला आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यातील घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यातील स्वारगेट बस डेपोत तरुणीवरील अत्याचार झाल्याच्या घटनेने पोलिसांनी तातडीने कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांचे पथके आरोपीच्या मागावर आहेत. आरोपी दत्ता गाडे फरार आहे. पुणे पोलिसांचे पथके त्याच्या शोधावर आहे. पोलिसांच्या कारवाईदरम्यान शिवशाहीच्या बसच्या एसटी ड्रायव्हरचा जबाब हाती आला आहे.

पुण्यातील स्वारगेट बस डेपोतील त्या शिवशाही एसटी ड्रायव्हरचा जबाब साम टीव्हीच्या हाती आला आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील 'त्या' एसटी बस चालकाने वरिष्ठांना सुपूर्द जबाब केला. मी त्या बसचा वाहक आहे, असं सांगून आरोपीने तरुणीवर अत्याचार केल्याचं चालकाने सांगितलं. स्वारगेट ते सोलापूर एसटी बस विनावाहक (कंडक्टर) होती. त्यानंतर मंगळवारी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांनी एसटी बस स्वारगेट आगारात पोहोचली होती. या बस चालकाने बस स्वारगेट बस स्थानकात रसवंतीगृहासमोर पुढे उभी केली.

बस चालकाने काय जबाब दिला?

बसचालकाने जबाबात म्हटलं की, सकाळी ६ वाजेदरम्यान मी बसचा वाहक आहे, असे सांगून एका प्रवासी महिलेला एका अज्ञात प्रवाशाने बसमध्ये घेऊन गेला. त्यानंतर त्यांच्यासोबत जबरदस्ती केली, असे जबाबात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, शिवशाही बस अत्याचार प्रकरणात स्वारगेटच्या एसटी डेपो व्यवस्थापनामधील काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. व्यवस्थापन कार्यालयात पहाटे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. तसेच स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांची सुद्धा पोलीस चौकशी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT