Pune-Nashik Highway Saam TV
मुंबई/पुणे

Pune-Nashik Highway: प्रवाशांनी भरलेल्या शिवशाही बसला भीषण अपघात; जखमींवर उपचार सुरू

Pune Nashik Highway Accident: पुण्याहून नाशिकच्या दिशेने शिवशाही बस जात असताना नारायणगाव बायपास येथे समोरून एक दुचकी वेगात आली.

साम टिव्ही ब्युरो

रोहिदास गाडगे

Accident News: रस्ते अपघातात आतापर्यंत हजारो व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. वेग मर्यादा ओलांडून नागरिक वाहन चालवतात. त्याने अनेकांना आपली चूक नसताना देखील जीव गमवावा लगतो. अशात पुणे-नाशिक महामार्गावरुन अपघाताची एक बातमी समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. (Latest Shivshahi Bus Accident News)

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव बायपासला शिवशाही बसला अपघात झालाय. पुण्याहून नाशिकच्या दिशेने शिवशाही बस जात असताना नारायणगाव बायपास येथे समोरून एक दुचकी वेगात आली.

समोर आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी शिवशाही चालकाने बस विरुद्ध दिशेला घेऊन जात असताना मागून एक कंटेनर समोर आला. यामध्ये शिवशाही बसचा अपघात झाला. या अपघात १४ प्रवाशी किरकोळ जखमी झालेत.

दरम्यान, अपघातग्रस्त बसचे दरवाजे अचानक लॉक झाल्याने समोरील काच फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सध्या जखमींना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. सुदैवाने अपघातात मोठा अनर्थ टळल्याची भावना काही प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

वाहन चालवताना वाहतूकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. हे नियम न पाळल्यानेच भीषण अपघात होतात. आता देखील बस चालकाची चूक नसताना दुचाकीस्वारामुळे मोठा अपघात घडला असता. मात्र दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Cancer: सकाळी वारंवार डोकं दुखतंय? डोकेदुखी ठरू शकते धोक्याची घंटी

Women Understanding: स्त्रियांबद्दलच्या 'या' गोष्टी पुरुषांना कधीच समजत नाहीत; ५ वी गोष्ट वाचून थक्क व्हाल

Crime News: एमआयएमच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; चंद्रपूर हादरलं!

Panvel Fort : पनवेलजवळील 'हा' किल्ला एकदा नक्की पाहा, सह्याद्रीत लपलाय १८व्या शतकातील भव्य इतिहास

Maharashtra News Live Update: शहापूरमध्ये ढगफुटीचा तडाखा; धबधब्यावर आलेले पाच पर्यटक पुरात वाहून गेले, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT