Pune News
Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात राडा; एकनाथ शिंदेंच्या फोटोला काळे फासले, तानाजी सावंतांचे कार्यालय फोडले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - सध्या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतुन (Shivsena) बंड केल्यानंतर राज्यभरात शिवसेना आक्रमक झालेली पहायला मिळत आहेत. अनेक शिवसैनिकांकडून आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत (Tanaji Sawant) हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला गेले.

त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या बालाजीनगर परिसरातील कार्यालयाची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. यानंतर तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील मुख्य कार्यालय आणि आणि घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवसेनेचा झेंडा हाताच घेऊन शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. गद्दार सावंत असे कार्यालयाच्या काचांवर लिहून कार्यालयाच्या काचा फोडल्या. यावेळी तानाजी सावंत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

हे देखील पाहा -

यापूर्वी एकनाथ शिंदे समर्थक आमदारांना धडा शिकवला जाईल असा इशारा काही शिवसेना नेत्यांनी दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी सावंत यांच्या कार्यलयाची तोफोड केली. सावंत यांनी पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. दुसरीकडे, पुण्यात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिदे यांच्या तर्फे उभारण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाच्या बोर्डाला देखील शिवसैनिकांनी काळे फासण्यात आले. पुण्यातील सदाशिव पेठेत हे कार्यालय आहे. हे कार्यालय देखील शिवसैनिकांकडून फोडण्यात आले आहे.

शिवसेनेकडून बंडखोरांना ४८ तासांचा अल्टिमेटम; १६ आमदारांवर होणार कायदेशीर कारवाई

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी आता शिवसेनेने कायद्याची मदत घेत हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत शिवसेनेने विधानसभेचे उपाद्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहीलं आहे. यात एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. येत्या सोमवारपर्यंत परत या अन्यथा कारवाई करु असं म्हणत शिवसेनेकडून बंडखोरांना ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी ही माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water Side Effects: नारळ पाणी कोणी पिऊ नये?

Today's Marathi News Live: भाविकांची प्रतिक्षा संपली! दोन जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन सुरू

Pandharpur News: भाविकांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन २ जूनपासून सुरू होणार

Tharla Tar Mag: सुभेदार कुटुंबिय साजरा करणार सायली-अर्जुनचा लग्नाचा पहिला वाढदिवस; मालिकेचा नवीन प्रोमो आऊट

Special Report | फडणवीसांची अजित पवारांना जाहीर क्लिन चिट!

SCROLL FOR NEXT