Uddhav Thackeray/Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? सरकार कोसळल्यावर पहिल्याच जाहीर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

सरकार कोसळल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर मुलाखत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षाचे मुखपत्र सामनासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. यावेळी उद्धव म्हणाले की, माझी तब्येत बिघडली होती, तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना आणि अभिषेक करत होते. पण असे काही लोक होते जे अगदी उलट इच्छा करत होते.

अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.

हे देखील पाहा -

या मुलाखतीत संजय राऊत यांनी सर्वात महत्त्वाचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला, तो म्हणजे आपलं नक्की काय चुकलं? तर यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये पहिल्याच सांगितलं आहे की चूक ही माझीच आहे आणि ते मी कबूल ही केलं आहे. मी यांना परिवारातला समजून मी यांच्यावरती अंधविश्वास ठेवला यात गुन्हा माझा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला का? असे प्रश्न विचारले असते ते म्हणाले की, महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला असता तर लोकांनी उठाव केला असता. पण तसं झालं नाही, जनता ही खुश होती, कारण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना पहिल्यांदा कर्जमुक्त केलं होतं. कोरोना काळात संपूर्ण माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी उत्तम सहकार्य केलं, म्हणूनच पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये माझं नाव आलं ते जनतेचा प्रतिनिधी म्हणून ते नाव आलं होतं. मी एकट्याने काय केलं असतं? बरं, मी तर घराच्या बाहेरही पडत नव्हतो. कारण घराबाहेर पडायचं नाही हेच मी लोकांना सांगत होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुणे मनपा प्रभाग रचना,२०२५ मध्येही ४ सदस्यांचा प्रभाग कायम | VIDEO

Maharashtra Live News Update : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला राज ठाकरेंची हजेरी असणार

RVNL Recruitment: रेल विकास निगम लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार २ लाख रुपये; आजच अर्ज करा

Artificial Intelligence: दररोज ChatGPT कडे किती प्रश्न विचारले जातात? ऐकून तुम्ही थक्क व्हाल

मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटातील नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT