Uddhav Thackeray/Sanjay Raut
Uddhav Thackeray/Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

...तेव्हा पासून सत्तांतराच्या हालचाली सुरु होत्या; शिंदे गटावर उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षाचे मुखपत्र सामनासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.

यावेळी उद्धव म्हणाले की, माझी तब्येत बिघडली होती, तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना आणि अभिषेक करत होते. पण असे काही लोक होते जे अगदी उलट इच्छा करत होते. मी उभा राहू शकत नव्हतो, याचा काहींना आनंद झाला होता. माझ्या शरीराची हालचाल होत नव्हती तेव्हा सत्तांतरासाठी हालचाली सुरु होत्या," असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

हे देखील पाहा -

सडलेली पानं आता गळून पडत आहेत. काही दिवसात नवीन पानं पुन्हा येतील, असं शब्दात बंडखोरांचा उल्लेख केला आणि सध्याची परिस्थिती बदलेल असा आशावाद व्यक्त केला. आपल्यासोबत अनेक वरिष्ठ शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांचे शिवसैनिक आशीर्वाद देत आहेत, अस उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेकडे आम्ही पक्ष नव्हे परिवार म्हणून पाहिलं. ज्यांना पक्ष संभाळायला दिला त्यांनीच विश्वासघात केला, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मला कुठेही त्या अनुभवातून सहानुभूती नकोच आहे. म्हणून खरं तर मी या विषयावर बोलणं टाळतो, पण तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया ही काय असते ते कोणत्याही डॉक्टरला विचारा. त्यात काय धोके असतात याची कल्पना मला होती. पण ती शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. माझी पहिली शस्त्रक्रिया झाली. या पहिल्या शस्त्रक्रियेतून मी चांगला होऊन बाहेर पडलो होतो. त्यानंतर पाच-सात दिवसांनी डॉक्टर मला म्हणाले, उद्धवजी, उद्या आपल्याला जिना चढायचा आहे. त्यामुळे मी त्या मानसिक तयारीत होतो की उद्या आपल्याला जिना चढायचाय. एक एक पाऊल पुढे जायचं… सकाळी जाग आल्यानंतर जरा आळस देण्याचा प्रयत्न केला आणि इतक्यात मानेत एक ‘क्रॅम्प’ आला आणि माझी मानेखालची सगळी हालचालच बंद झाली. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, श्वास घेताना मी पाहिलं तर माझं पोटही हलत नव्हतं. पूर्णपणे मी निश्चल झालो होतो. एक ‘ब्लड क्लॉट’ आला होता. सुदैवाने डॉक्टर वगैरे सगळे जागेवरच होते. ज्याला ‘गोल्डन अवर’ म्हणतात, त्या ‘गोल्डन अवर’मध्ये ऑपरेशन झालं म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे बसलो आहे. त्यावेळी माझे हातपाय हलत नव्हते, बोटं हलत नव्हती, सगळ्यात मोठं टेन्शन होतं की डास चावला, मुंगी चावली तर खाजवायचं कसं? हाही एक वेगळा विचित्र भाग होता. त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार?… तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती.

मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. जेव्हा मी तुम्हाला पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती, नंबर दोनचं पद दिलं होतं. पक्ष सांभाळण्यासाठी पूर्ण विश्वास टाकला होता, त्या विश्वासाचा घात तुम्ही केलात. मी हॉस्पिटलमध्ये असताना माझी हालचाल बंद होती. तेव्हा तुमच्या हालचाली जोरात होत्या आणि त्याही पक्षाच्या विरोधात.असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

SCROLL FOR NEXT