Shivsena Thackeray Group Mp Sanjay Raut Says NDA biggest defeat will be in Maharashtra  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News: एनडीएचा सर्वात मोठा पराभव महाराष्ट्रात होणार; संजय राऊत काय म्हणाले, वाचा...

Sanjay Raut Latest News: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. एनडीएचा सर्वात मोठा पराभव हा महाराष्ट्रातच होणार, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut Latest News: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन 'इंडिया आघाडी'ची स्थापना केल्यानंतर भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. २०२४ च्या निवडणुकीला सामोर जाण्यासाठी भाजपला आत्मविश्वास राहिला नाही, त्यामुळे त्यांनी पक्ष फोडणे सुरू केले आहेत. पण लक्षात ठेवा एनडीएचा सर्वात मोठा पराभव हा महाराष्ट्रातच होणार, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

खासदार संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे मुंबईत माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. मणिपूरसारख्या राज्यात चीनचा हस्तक्षेप असल्यामुळे दंगे होत आहेत, असं या देशाचे माजी लष्करप्रमुख समोर येऊन सांगतात. अशा वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जबाबदारी आहे की, देशाला मणिपूर संदर्भातील त्यांच्या मन की बात काय आहे ते स्पष्ट करावी, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संसदेमध्ये विरोधकांचा आवाज दडपाडयचा त्यांचं काही ऐकायचं नाही आणि आपला कार्यक्रम रेटायचा, याच्यामुळे देशातील एकंदर परिस्थितीवर चर्चा व्हावी म्हणून आम्ही अविश्वास ठराव आणला आहे, असंही राऊतांनी स्पष्ट केलं आहे. राहुल गांधी यांनी एखाद्या योद्ध्यासारखी संसदेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राहुल गांधी या प्रस्तावावर काय बोलतात? याच्यावर देशाचं लक्ष असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र सदनामध्ये एनडीएमधील सर्व खासदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीवर संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुळात एनडीए आहेत तरी कुठे असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

शिवसेनेतून तुटलेला एक गट, राष्ट्रवादीतून तुटलेला एक तुकडा आणि मग इतर सगळे गोळा केलेले ताकडे-तोकडे जुळवले आहेत, मूळ एनडीए कुठे आहे? शिवसेना, अकाली दल, जनता दल, एआयडीएम, तृणमूल काँग्रेस या मुख्य पक्षांनी उभा केलेला एनडीए कुठे आहे? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र सदनमध्ये त्यांना बैठक घेऊ द्या, पण लक्षात ठेवा एनडीएचा सर्वात मोठा पराभव हा महाराष्ट्रातच होणार, तो इतिहासातला सर्वात मोठा पराभव असणार आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT