Mumbai News  Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray News : ठाकरे गटाला गळती सुरुच, अनिल परबांचा निकटवर्तीय नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला

Mumbai Political News : शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक संजय अगलदरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबईती लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना सोबत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक नगरसेवक पक्षाला सोडून जाताना दिसत आहे.

आज शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक संजय अगलदरे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. संजय अगलदरे हे माजी मंत्री अनिल परब यांची निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (Maharashtra Politics)

संजय अगलदरे हे मुंबई महापालिकेत ३ वेळा नगरसेवक राहिले आहेत. एकदा वरळी तर दोन वेळा खारदांडा येथून ते नगरसेवक म्हणून महापालिकेवर गेले आहेत. आज वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. (Political News)

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेतल्या जातील, असा अंदाज उद्धव ठाकरे यांनी वर्तवला होता. आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात माजी नगरसेवकांचे शिंदे गटाच इनकमिंग वाढलं आहे.

2017 नंतर बीएमसी राजकीय पक्षांचे संख्याबळ

  • शिवसेना - 84+ अपक्ष 3 +6 (मनसेतून आलेले ) = 93

  • भाजप - 83 + 1 अपक्ष + 1 अभासे = 85

  • काँग्रेस - 30

  • राष्ट्रवादी - 9

  • सपा - 6

  • MIM - 2

  • मनसे - 1

मुंबईतून ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक

  1. शीतल म्हात्रे

  2. यशवंत जाधव

  3. सुवर्णा कारंजपे

  4. परमेश्वर कदम

  5. वैशाली शेवाळे

  6. दिलीप लांडे (नगरसेवक + आमदार)

  7. मानसी दळवी

  8. किरण लांडगे (अपक्ष परंतु शिवसेनेला पाठिंबा दिला होता, आता शिंदे गटात)

  9. समाधान सरवणकर

  10. अमेय घोले

  11. संतोष खरात

  12. दत्ता नरवनकर

  13. सान्वी तांडेल (अपक्ष परंतु शिवसेनेला पाठिंबा दिला होता, आता शिंदे गटात)

  14. आत्माराम चाचे

  15. चंद्रावती मोरे

  16. संजय अगलदरे (आज पक्ष प्रवेश)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Jalgaon News : अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; घटनेने जळगाव शहरात खळबळ

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT