Maharashtra Politics, Eknath Shinde, Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Political News : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी अपडेट; दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपला, सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला

आता प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Shivaji Kale

नवी दिल्ली : राज्यातील शिवसेनेच्या ठाकरे-शिंदे गटाच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टास सुरु असलेली सुनावणी संपली आहे. सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. सलग तीन दिवसांनंतर दोन्ही बाजूंचा कोर्टातील युक्तीवाद पूर्ण झाला आहे.

आता प्रकरण सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने सातत्याने अशी मागणी केली आहे. (Maharashtra Political News)

आज सुनावणी सुरू झाल्यानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून जोरदार युक्तीवाद झाला. दुपारी लंच ब्रेकची वेळ झाली असतानाही कोर्टानं जेवणाची वेळ पुढे ढकलत सुनावणी सुरू ठेवली. अखेरीस सुप्रीम कोर्टानं हा निकाल राखून ठेवला आहे. निकालाची तारीख मात्र कोर्टाने जाहीर केलेली नाही.  (Latest Marathi News)

विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो की नाही, याच मुद्द्यावर हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटापीठाकडे देण्याची उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी मागणी केली आहे. सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवल्याने प्रकरण ७ जणांच्या खंडपीठाकडे जाणार का? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT