Uddhav Thackeray  saam tv
मुंबई/पुणे

मुंबई हायकोर्टाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'कायदा व्यवस्थेची जबाबदारी...'

'न्याय देवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निर्णयाचे स्वागत केले.

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray News : शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला. दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai) दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर दोन्ही गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आज, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालायाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला परवानगी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालायाच्या या निर्णयावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'न्याय देवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निर्णयाचे स्वागत केले. 'कायदा व्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची, असेही ठाकरे यांनी नमूद केले.

आज मुंबई उच्च न्यायालयात दोन्ही गटाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. या दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तिवाद मुंबई उच्च न्यायालयाने ऐकला. मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही गटाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला परवानगली दिली आहे. त्यानंतर मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात शिवसैनिकांनी जल्लोष केला. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मातोश्रीवर देखील आनंद उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, विजयादशमीच्या दिवशी आमचा मेळावा होतो. आम्हाला आज विजय मिळाला आहे. न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला. न्यायदेवतेवर आमचा विश्वास होता. शिवसैनिकांना आवाहन आहे की वाजत गाजत या, पण गालबोट लागेल असं काही करू नका. उत्साहामध्ये या वाजत गाजत या. आमच्यात दोन गट झालेले नाही. आमची शिवसेना तशीच आहे'.

'शिवसेनेचा मुंबईतील मुंबईतील मेळावा बघितला असेलच. कसा झाला ? प्रत्येकवेळी आपण वाईटाचा विचार करू नये. 'शुभ बोल नाऱ्या' अशी एक म्हण आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशीची कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या दिवसाची कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही राज्य सरकारची असेल', असेही ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. त्यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'ते सुप्रीम कोर्टात जात असतील, तर त्यांची मर्जी आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT