Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; शिवसेना ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Satish Daud

Sanjay Raut on BJP Mla Ganpat Gaikwad Firing

भाजपचे कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी रात्री गोळीबार केला. हिललाईन पोलीस ठाण्यातच हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनं संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर शिवसेना ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षांमध्ये माफिया आणि गुंडांचे राज्य सुरू आहे. निवडणुकांसाठी गुंडांची मदत व्हावी म्हणून पुणे, मुंबई, कोल्हापूर, ठाणे जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांना जामीनावर बाहेर काढलं जात आहे", असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत बोलत होते.(Latest Marathi News)

"महेश गायकवाड कोण आहे, हे मला माहिती नाही. पण त्यांच्यावर आमदारानेच गोळीबार केला, हा प्रकार धक्कादायक आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री कुठे आहे. ते आम्हाला कायदा शिकवतात. अजित पवार म्हणतात मी गृहमंत्र्यांशी चर्चा करीन, हे प्रकरण फक्त गृहमंत्र्यांसोबत चर्चा करण्यापुरतंच मर्यादीत नाही", अशी टीकाही राऊतांनी केली.

"आज महाराष्ट्रामध्ये वरिष्ठ पोलिसांच्या कॅबिनमध्ये गोळीबार होतो. देवेंद्र फडणवीस आपण वकील आहात, ज्ञानी आहात. राम तुमच्या बाजूने आहे, तुमचं राज्य कायद्याचं आहे का? ज्या आमदाराने गोळीबार केला आहे त्याला जामीन मिळेल", असा घणाघातही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

"भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांचं निवेदन सामान्य जनतेने समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच मी गोळीबार केला, असं ते म्हणत आहेत. कारण मुख्यमंत्रीच गुन्हेगारांना पाठिशी घालत आहेत आणि मदत करत आहेत", असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT