Sanjay Raut on Kirit Somaiya Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut: मी सर्वसामान्य शिवसैनिक, किरीट सोमय्या 'चु**'...; राऊत कडाडले

ज्या माणसाने मराठी विरोधीत भूमिका घेतली, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) महाराष्ट्र द्रोही आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने राऊत यांची अलिबागमधील मालमत्ता, तसेच मुंबईतील दादर येथील फ्लॅटवर जप्तीची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. मनी लाँड्रिंगमधील एक रुपया जरी आमच्या खात्यात आला असेल तर, सगळी मालमत्ता भाजपला दान करू, असं राऊत म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. 'असत्यमेव जयते' असं त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना त्यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. ज्या माणसाने मराठी विरोधीत भूमिका घेतली, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) महाराष्ट्र द्रोही आहेत. त्याचबरोबर राऊतांनी किरीट सोमय्यांवर अश्लील भाषेत टीका केली आहे. (Sanjay Raut on Kirit Somaiya)

दरम्यान ईडीने कारवाई केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. संजय राऊत यांना आधीच लक्षात आले होते त्यांनी म्हणून त्यांनी 55 लाख ईडी कार्यालयात परत केले होते असे किरीट म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या पत्नीचे व्यवहार असल्याचे म्हटले आहेत. मागील दोन महिन्यापासून ते ज्या पद्धतीने त्यांनी आरोप केले ही त्यांची मानसिक अवस्था मी समजु शकतो. यांना वाटतं पोलिसांचा माफियासारखा वापर करून तोंड बंद करू पण कारवाई होणार त्याच अनुषंगाने संजय राऊत यांनी प्रॉपर्टी जप्त केली आहे असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

1 हजार 48 कोटींचा घोटाळा ही कारवाईची सुरुवात आहे. कारवाई होणार नाही हा त्यांचा भ्रम आहे. मी काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांना भेटलो होतो असेही किरीट सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या म्हणाले मी काही दिवसांपुर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मला असे वाटत की संजय राऊत यांना चाहूल लागली होती, म्हणून गेले काही दिवस यांची नौटंकी सुरू होती त्यावर आज पडदा असल्याचंही सोमय्या म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT