Shivsena/Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

'शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर, बारणे काय म्हणतायत ते बघा; पक्ष वाढीचं सोडा आहे तो टिकवा'

आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेते, अशी खोचक टिप्पणी गजानन किर्तीकर यांनी केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) हे शिवसंपर्क अभियानानिमित्त हे नागपूराला गेले आहेत. हे शिवसंपर्क अभियान शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी असल्यांचही राऊतांनी सांगितलं आहे. त्यांच्या याच पक्षवाढीच्या वक्तव्यावरुन आता भाजप नेते अतुल भातकळकरांनी (Atul Bhatkalkar) टोला लगावला आहे 'पक्ष वाढीचे सोडा आहे तो पक्ष टिकवा' असं भातकळकर म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर आणि श्रीरंग बारणे (Shivsena MPs Gajanan Kirtikar and Shrirang Barne) काय बोलले ते पहा, पक्ष वाढीचे सोडा आहे तो पक्ष टिकवा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर न झुकणाऱ्या नवाब मलिक (Nawab Malik) यांना समर्थन देत आहेत राऊत नवाब मलिक यांच्यासमोर सत्तेसाठी झुकत आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी राऊतांवर केली.

तसंच पोलिसांचा वापर यांनी आपल्या कामासाठी सुरू केला आहे. त्यामुळे आता अनेक वाझे तयार झालेत. अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी यांनी ST बाबत एक निवेदन देखील नाही केलं. यांना फक्त मोदी आणि भाजप द्वेषाची मळमळ आहे. यांचे फक्त वाझेगिरी करणं हे एकमेव काम असल्याचंही भातकळकर म्हणाले.

काय आहे बारणे आणि किर्तीकर वाद -

शिवसेनेचा मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळावी अशा आशयाची एक पोस्ट राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली होती. त्यांच्या या पोस्टवरुन मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती ते म्हणाले, मुळात ही मागणी करण्यात आली की करायला लावली, अशी शंकाही बारणे यांनी उपस्थित केली. तसंच लोकसभा निवडणुकीला अजून 2 वर्षे बाकी असताना आत्तापासूनच ही मागणी का केली जातेय, 2 वर्षांत बरीच स्थित्यंतर होऊ शकतात, असा सूचक इशाराही बारणे यांनी दिला होता.

तर दुसरीकडे

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळवी केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या 25 /15 योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळत आहे. आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेते, अशी खोचक टिप्पणी गजानन किर्तीकर यांनी केली होती.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT