shivsena 16 mla disqualification case  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena MLA Disqualification Case: मोठी बातमी! शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचा मुहूर्त ठरला

Shivsena MLA Disqualification Case: १६ आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी आता ३ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

Shivsena Political Crisis:

शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. १६ आमदार अपात्रबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात काल सुनावणी पार पडली. यानंतर आता १६ आमदार अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

काल शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रबाबतच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर ताशेरे ओढण्यात आले. त्यानंतर त्यांना एका आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

या सुनावणीनंतर आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर रोजी शिंदे गटाच्या १६ आमदारांचं भवितव्य ठरण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे .

ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली होती. या सुनावणीदरम्यान विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्यात सुनावणी घेऊन त्याबाबतची रूपरेषा ठरण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोर्टाने २ आठवड्यानंतर काय कार्यवाही केली, त्याचा तपशील देखील मागितला आहे.

उद्धव ठाकरेंच्या याचिकेवर सुनावणी कधी?

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. कालच सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेली याचिका आणि 16 आमदार अपात्रता प्रकरणावरील दोन्ही सुनावणी पार पडल्या होत्या.

सुप्रीम कोर्टाने ओढले विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे

काल सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्यात सुनावणी घेण्यात आदेश दिले आहेत. एका आठवड्यामध्ये सुनावणी करून कार्यवाही करण्यासही सांगितले. तसेच त्याबद्दल माहिती देखील सुप्रीम कोर्टात सादर करण्यास सांगितले आहे, असं कोर्टाने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपा विषारी सापासारखा, त्याला मारून टाका; मल्लिकार्जुन खरगे यांची जहरी टीका

Beed Politics : बीडचं राजकारणच वेगळं; मुलाच्या विरोधात प्रचारासाठी वडील उतरले मैदानात

VIDEO : 'एक मैं और एक तू... ', जेव्हा अमित ठाकरे गाणं गातात | Marathi News

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

SCROLL FOR NEXT