रुपाली बडवे
Aditya Thackray News : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी जय्यत केली आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.मुंबई महानगरपालिका आणि अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या (BMC) सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होणार आहे. या निर्णयाचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. यावर आता शिवसेने नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे सरकार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात २०१७ च्या नुसार राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहे. त्यामुळे राज्यातील महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे. मात्र, मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी २०१७ ची प्रभाग रचना ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर निर्णयावरून सावध झाली आहे. शिंदे सरकारच्या या निर्णयावरून आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. 'शिंदे सरकारला निवडणुकीला सामोरे जायचं नाही, म्हणून हा सर्व खटाटोप सुरू आहे. कोर्टाच्या सुनावण्या विरोधात जाऊन काम सुरु आहे', अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी टीका केली.
दरम्यान, आज आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडचा आढावा घेतला. कोस्टल रोडच्या प्रकल्पावर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'कोस्टल रोडचा सातत्याने आम्ही आढावा घेत आहे.काम खूप वेगात सुरू आहे. अडचणी सोडवण्याचं काम सुरूच आहे. हे काम निवडणुकीसाठी नाही. डिसेंबर २०२३ पर्यंत काम होईल, असं वाटतं. मी आज येथे स्थानिक आमदार म्हणून आलो आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.