Shivsena Dasara Melava Crowd Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Dasara Melava: कुणाच्या मेळाव्याला किती गर्दी? मुंबई पोलिसांच्या आकडेवारीने नवा वाद

Shivsena Dasara Melava Crowd News: दोन्ही सभांपैकी कुणाच्या सभेला जास्त गर्दी होती याबाबत आता तर्क-वितर्क लावले जात असताना मुंबई पोलिसांनी आकडेवारी जाहीर केली आहे.

सुरज सावंत

मुंबई: शिवसेनेच्या (Shivsena) राजकीय इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे झाले आहेत. एक म्हणजे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर दुसरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा. उद्धव ठाकरेंची सभा ही दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात होती, तर एकनाथ शिंदेंची सभा ही बीकेसी मैदानात (BKC Ground) झाली. या दोन्ही सभांना प्रचंड गर्दी जमली होती. मात्र, या दोन्ही सभांपैकी कुणाच्या सभेला जास्त गर्दी होती याबाबत आता तर्क-वितर्क लावले जात असताना मुंबई पोलिसांनी आकडेवारी जाहीर केली आहे. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदेंच्या सभेला जास्त गर्दी होती असा दावा केली जात आहे. (Shivsena Dasara Melava News)

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन मेळावे झाले. या मेळाव्यात चढाओढ होती ती म्हणजे जमणाऱ्या गर्दीची. एकीकडे जिथे उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा घेतला त्या शिवाजी पार्क मैदानावर सुमारे ६५ ते ७० हजार लोकांनी उपस्थिती दर्शवली. शिवाजी पार्क मैदानाची क्षमता सुमारे ५५ ते ६० हजार असून पोलिसांच्या अंदाजानुसार बरेच लोक मैदानात होते तर बरेच लोक मैदानाबाहेरही उभे होते. शिवाजी पार्क ६५ हजार (पाच हजार कमी किंवा जास्त असू शकतात) उपस्थित असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यत्त केला आहे. (Maharashtra News)

तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानावर दसरा मेळावा घेतला. बीकेसी मैदानाची क्षमता ही दीड लाखांच्या आसपास आहे. त्यानुसार मुख्यमंत्री यांच्या सभेला ९० हजारे ते १ लाख नागरिक BKC च्या सभेला आले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला केला आहे. पोलिसांनी दिलेली ही आकडेवारी अंदाजे व्यक्त केली गेलेली आहे. त्यामुळे या आकडेवारीवर शिवसेनेने शंका उपस्थित केली आहे.

याबाबत शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सामटीव्ही बातचीत करताना म्हणाल्या की, तुमच्याच सामटीव्हीच्या प्रतिनिधींनी त्याठिकाणी जाऊन रिपोर्टींग केली. त्यात अनेक महिला रडत होत्या ज्यांना शिंदे गटातील लोकांनी फसवून आणलं होतं. त्यांना खाण्या-पिण्याचं आमिष दाखवून बीकेसीत आणण्यात आलं, ते बळजबरीनं आणलेली लोकं होती असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. आमच्या सभेतला जिवंतपणा पोलिसांना दिसणार नाही, कारण पोलिसंही पाहिजे तो आकडा त्यांना (शिंदे गटाला) लिहून देतील. आमची जेवढी माणसं होती तेवढी निष्ठेनं आलेली होती त्यामुळे त्यांच्या सभेत डोकी जास्त दिसत असली तरी त्याने काही फरक पडत नाही असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT