Ajit Pawar On Shivsena Dasara Melava saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar : शिंदे की ठाकरे? दसरा मेळाव्यात कुणाचं भाषण ऐकणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

दसरा मेळ्याव्यात शिंदे की ठाकरे कुणाचं भाषण पहिले ऐकणार? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी, साम टिव्ही

Ajit Pawar On Shivsena Dasara Melava : शिवसेनेचा (Shivsena) दसरा मेळावा आता काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) एकाच दिवशी होणार असल्याने कुणाच्या मेळाव्याला जायचं? असा पेच निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांना तुम्ही कुणाचं भाषण ऐकणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर पवारांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. (Ajit Pawar News Today)

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे आज पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. दसरा मेळ्याव्यात शिंदे की ठाकरे कुणाचं भाषण पहिले ऐकणार? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला.

यावर उत्तर देताना पवार म्हणाले, 'उद्धव ठाकरे आणि शिंदे या दोघांची भाषणं एकाचवेळी सुरू झाली तर मी प्रथम उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकेन. त्यानंतर टीव्हीवर रिपीट करण्यात येणारे एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकेन' असं अजित पवारांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेशी असलेला ऋणानुबंध शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न करेल. असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं. दसरा मेळाव्यावरुन सध्या शिवसेना आणि शिंदे गटात सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप, आव्हान-प्रतिआव्हान यासंदर्भातही अजित पवार यांनी मत मांडले.

'मोठमोठे राजकीय मेळावे केले जातात, तेव्हा कार्यकर्त्यांना बोलावलं जातं. तेव्हा अशा घटना घडत असतात. दोन्ही गटांमध्ये कोणाचा दसरा मेळावा मोठा? यावरुन इर्षा निर्माण झाली आहे. नियमांचे पालन करुन आपापला दसरा मेळावा मोठा करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे', असे अजित पवार यांनी सांगितले.

राज्यात सध्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वातावरणं तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरू असून बॅनरबाजी देखील करण्यात येत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात कोणत्या गटाची सरशी होते?, हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT