Shivsena Crisis Will Uddhav Thackeray will get Shiv Sena name and Dhanushyaban party symbol back 31 July 2023 Supreme Court hearing  Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Crisis: उद्धव ठाकरेंना 'शिवसेना' नाव आणि 'धनुष्यबाण' परत मिळणार? ३१ जुलैला काय होणार?

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गटाला दिलं होतं. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

साम टिव्ही ब्युरो

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Supreme Court: एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. इतकंच नाही, शिंदेंनी आपलीच शिवसेना खरी असा दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली. आयोगाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव शिंदे गटाला दिलं.

यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाने निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. निवडणूक आयोगाचा हा निर्णय पक्षपाती असल्याचं म्हणत ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. आता या याचिकेवर येत्या ३१ जुलैला सुनावणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह दिल्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, विधीमंडळ पक्षातील फुटीला पक्षातील फुट समजणं चुकीचं असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणणं आहे. यावर ३१ जुलै रोजी सुनावणी होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे.

ठाकरे गटाने आपल्या याचिकेत काय म्हटलं?

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना निवडणूक चिन्ह आणि शिवसेना नाव देऊन चिन्ह आदेशाच्या परिच्छेद १५ नुसार दिलेल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे, असा दावा ठाकरे गटानं याचिकेतून केला आहे. आयोगानं विधीमंडळ पक्षातील फुटीला पक्षातील फुट म्हणून स्विकारणं चुकीचं आहे, असंही ठाकरे गटाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंना शिवसेना परत मिळणार?

त्याचबरोबर पक्षविरोधी कारवायांमुळे एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना सदस्यत्वासाठी अपात्र ठरवलं जाऊ शकतं, याकडेही निवडणूक आयोगानं दुर्लक्ष केलं आहे, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. इतकंच नाही, तर २०१८ साली शिवसेनेकडून पक्षाच्या घटनेत बदल करण्यात आल्याचा दावाही ठाकरे गटाकडून याचिकेत करण्यात आला आहे.

दरम्यान, आता या प्रकरणाची सुनावणी येत्या ३१ जुलैला होणार सुप्रीम कोर्टात (Supreme Court) असून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार की? उद्धव ठाकरे यांना परत मिळणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT