Aaditya Thackeray vs Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Aaditya Thackeray News: CM म्हणजे ‘करप्ट माणूस, लवकरच खुर्ची जाणार; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aaditya Thackeray On CM Eknath Shinde: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shivsena News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. सीएम याचा अर्थ आता नवीन लावला जाणार आहे. सीएम म्हणजे 'करप्ट माणूस' अशी ओळख निर्माण झाली आहे. हे सरकार संविधान बदलणार सरकार आहे, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे.  (Latest Marathi News)

मुंबईतील गोरेगाव येथे शिवसेना ठाकरे गटाची शिवगर्जना सभा पार पडली. या सभेतून आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं. या अंधारात देखील आपल्या हातात एक वेगळं शस्त्र आहे. ते म्हणजे मशाल. आपल्या सभेला गर्दी होते. पण, त्यांच्या सभेला फक्त खुर्च्यांची गर्दी होते, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

३३ देशांमध्ये जिथे तिथे गद्दारांची यांची नोंद घेतली गेली, त्यांना हे पटलं नाहीये, सर्व सर्व्हे मधून हेच पुढे येतेय, असे सांगताना या मुख्यमंत्र्यांची खुर्ची लवकरच जाणार आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. (Maharashtra Political News)

'शेतकऱ्यांना १ रुपयाही पोहोचला नाही'

गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, तरीही शेतकऱ्यांना एक रूपयाही मिळाला नाही. आपण कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं, ते पूर्ण करून दाखवलं. आज शेतकरी सांगत आहे, उद्धव ठाकरेंनी दिलेली कर्जमुक्ती मिळाली. ५० ओके एकदम ओके या घोषणा त्यांना झोंबायचे तिथे बरोबर झोंबत आहेत या सरकारचं काहीच नाही मिळालं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

आपल्या घटनाबाह्य मुख्यमंत्री (Eknath Shinde) यांनी डाव्होस इथे जाऊन फक्त २८ तास राहिले आणि ४० कोटी खर्च केले. कोणी ठरवून पण हे करू शकणार नाही. एमएसआरडीसी रस्त्यावर आता ४ टोल लावण्यात आले आहेत. आजपर्यंत या मुंबईवर २५ वर्षं शिवसेनेची सत्ता आहे आणि येणाऱ्या २५ वर्षात देखील शिवसेनेचीच सत्ता राहणार आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone: कोणत्या भाज्या कच्च्या खाऊ नयेत? किडनी स्टोनचा धोका टाळण्यासाठी उपाय

Mumbai : लिंक रोड,टनेल रोड ते कोस्टल रोड, मुंबईचा कायापालट होणार ; मेट्रोच्या बड्या अधिकाऱ्यानं सांगितला रोड मॅप

Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात राडा, मालतीने फरहानाला लाथ मारली अन् टेबल..., पाहा VIDEO

Processed Food Side Effect: जास्त प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने होतात 'हे' नुकसान, आजपासूनच घ्या काळजी

Maharashtra Live News Update: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी

SCROLL FOR NEXT