Shivsena Uddhav Thackeray vs Eknath Shinde Group
Shivsena Uddhav Thackeray vs Eknath Shinde Group SaamTV
मुंबई/पुणे

...तर तुमचा सुफडा साफ; शिंदे गटातील आमदाराला शिवसैनिकाने सुनावले खडेबोल, पाहा Video

Jagdish Patil

रश्मी पुराणिक -

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेला शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे ही कायदेशीर लढाईचे घटनापीठाकडे गेलेले प्रकरण ४ ते ५ वर्ष चालणार असल्याचे खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केलं होतं. शिवाय शिवसेनेची (Shivsena) धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटालाच मिळेल, असा दावाही भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला होता.

त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात चांगलेच पडले होते. शिवाय या वक्तव्यावर शिंदे गटाला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. याच सर्व प्रकरणावरुन आता गोगावले यांच्या मतदार संघातील एका शिवसैनिक (Shivsainik) अनिश गाढवें यांनी आता आमदार गोगावलेंना खडे बोल सुनावले आहेत.

या शिवसैनिकाने याबाबतचा एक व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला असून या व्हिडीओमध्ये गोगावले पुन्हा निवडून येणार नाही असं सांगितलं आहे शिवाय यासाठी आकडेवारीच जाहीर केली आहे.

या व्हिडीओमध्यो शिवसैनिक म्हणत आहे की. गोगोवले साहेब आपण कर्जतमध्ये आपण एक विधान केलं की, सत्तासंघर्षाचा निकाल ५ वर्ष लागणार नाही. पुढे देखील आम्हीच निवडून येणार असं आपण बोललात, बोलण्याच्या ओघात काही गुपित बाहेर निघत आहेत. शिवाय आपण केलेल्या वक्तव्यामुळे तुमच्यावर कोर्टाची अवमान याचिकेची कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे सांभाळून वक्तव्य करा असा सल्ला हा शिवसैनिक गाढवे यांनी गोगावलेंना दिला आहे.

तसंच गद्दारी करणं वेगळ असंत आणि कोर्टाचा निर्णय वेगळा असतो. आपण म्हणता की पुढच्या निवडणुकीमध्ये आपण आमदार होणार मात्र, आकडेवारीनुसार २०१४ च्या निवडणुकीत आपल्याला ९४ हजार मतं, काँग्रेसला ७४ हजार तर भाजपला ३ हजार मतदान झालं होतं.

हे ९४ हजार तुमच्या घरचे नव्हते, ते सर्व शिवसैनिक होते. तुमचे मोजके कार्यक बाजूला काढले तर आजही ८० ते ८५ हजार महाड मतदार संघातील जनतेचा जनाधार शिवसेनेच्या बाजूने आहे. शिवाय आपण केलेल्या गद्दारीविरोधात गेलेला मतदार, तुम्ही विधानसभेसमोर केलेला दंगा न आवडल्यामुळे दुखावलेला मतदार वेगळा आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसने उमेदवारी दिली तर तुमचा सुफडा साफ होईल. निवडणूका झाल्या तर शिवसेनेला १ लाख ते १ लाख १२ हजाराच लीड मिळेल. तुम्हाला कमळासकट फक्त ३० ते ३५ हजाराचं मतं पडतील असा दावा या शिवसैनिकाने केला आहे.

अडीच वर्षासाठी मंत्रीपद पदरात पडेल त्यासाठी तडफड आक्रमकपणा जपून ठेवा, आमदार आहात किती जाबाबदारीने बोललं पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो. पण, तुमच्या पुढे कसली जबाबदारीची अपेक्षा ठेवायची असा टोलाही या व्हिडीओमध्ये शिवसैनिकाने लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: दररोज करा हे 2 योगासन, यकृत राहील निरोगी

Liver Health: यकृताचे आरोग्य सुधारण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

Dharashiv Crime : कळंब शहरात दुकानावर दरोडा; १ लाख रुपये व सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी

Today's Marathi News Live: दादरमधील रेस्टॉरंट बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ

Rinku Singh- Yash Dayal: एका ओव्हरमध्ये ५ षटकार मारणाऱ्या रिंकूची यश दयालसाठी खास पोस्ट - Photo

SCROLL FOR NEXT