Shivajirao Adhalrao-Patil Saam Tv
मुंबई/पुणे

महाविकास आघाडी २००९ मध्ये होणार होती; माजी खासदार शिवाजीराव पाटलांनी सांगितला 'तो' किस्सा

आढळराव पाटील आता शिंदे गटात सामील झाले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

पुणे: एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला (Shivsena) उतरती कळा लागली आहे. शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेनेही अनेक दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सामनामध्ये छापण्यात आली होती, पण ही बातमी नजर चुकीने छापली असल्याचे सांगण्यात आले होते. शिवाजीराव आढळराव पाटीलही आता शिंदे गटात सामील झाले आहेत. या संदर्भात आज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रीया दिली.

माजी खासदार शिवाजीराव पाटील म्हणाले, ३ जुलैला माझी शिवसेनेतून (Shivsena) हक्कलपट्टी केली, तेव्हापासून मी शांत होतो. मनाला वेदना झाल्या. त्यानंतर माझी हक्कलपट्टी रद्द केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंना भेटलो माझी नाराजी व्यक्त केली. मी नवीन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले म्हणून हक्कलपट्टी केली होती हे मला पटण्यासारखे नव्हते, असंही पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना माजी खासदार पाटील यांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीची (Election) आठवण सांगितली. २००९ साली संजय राऊत यांनी मला पुणे लोकसभा मतदारसंघात लढण्यासाठी सांगितले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीसोबत जुळवून घेण्याचा सल्ला दिला होता. ज्या पक्षाविरोधात लढतोय त्यांच्याबरोबर जुळवून घ्यायच शक्य नव्हते. आम्ही शिवसेना संपवायला निघालेल्या पक्षाशी जुळवून घेणे शक्य नाही. त्यामुळे आता आम्ही मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठबळावर काम करणार आहे, असंही पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना खेड पंचायत समितीमधील शिवसेना सदस्य फोडून शिवसेनेच्याच लोकांना जेलमध्ये टाकले होते. आपले मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही अनेकदा त्यांना जाऊन भेटलो पण न्याय मिळाला नाही. राष्ट्रवादी सर्व नेते म्हणायचे आमचा संबंध नाही खेड राजकारणात, पण सर्व तेच करत होते. संजय राऊत यांनीच राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना बांधून ठेवली, असा आरोपही शिवाजीराव पाटील यांनी केला.

मी तीनवेळा खासदार झालो माझा गुन्हा काय आहे, माझी तुम्ही हकालपट्टी केली, असा सवालही पाटील यांनी केला. २००९ च्या लोकसभेवेळीच महाविकास आघाडी होणार होती. ती फक्त शिरूर लोकसभा मतदारसंघामुळे आडून राहिली. शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी २००९ साली शिवसेना आणि राष्ट्रवादी युती फायनल झाली होती. पण फक्त शिरूर लोकसभा मतदार संघामुळे अडली. शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊत यांच्यात चर्चा झाली होती.

२००९च्या लोकसभेला महाविकास आघाडी होणार होती

शरद पवार (Sharad Pawar) यांना पंतप्रधान करण्यासाठी युती केली जाणार होती. राष्ट्रवादी आणि शिवसेना युती फायनल झालेली आहे, मला असं सांगण्यात आले होते. यासाठी उद्धव ठाकरेंची सभा रद्द केली जाणार होती. त्यावेळी शरद पवार शिरूरमधून आणि मला मावळ मधून लढायचे होते.पण त्यावेळी मी मला गृहीत धरू नका, असं म्हणून बाहेर पडलो होतो. त्यानंतर ही युती करायचे रद्द झाले होते. आत्ताची ही महाविकासआघाडी तेव्हाच झाली असती, असंही माजी खासदार शिवाजीराव पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT