Shivsena Dasara Melava Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Andheri Election : ठाकरेंना धनुष्यबाण मिळून नये म्हणून शिंदे गटाची नवी चाल?

ठाकरे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळून नये म्हणून आता शिंदे गटाने नवी चाल

सूरज सावंत

Shiv Sena Political Crisis : अंधेरी पूर्वच्या (Andheri) पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का देण्यासाठी शिंदे गटाने नवी रणनिती आखली आहे. ठाकरे गटाला धनुष्यबाण (Shivsena) चिन्ह मिळू नये म्हणून आता शिंदे गटाकडून सुद्धा पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टिव्हीला दिली आहे. (Shivsena News Today)

एकाच चिन्हावर दोन उमेदवार दिल्याने पेच निर्माण होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल, अशी शिंदे गटाची रणनीती असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाची काल वर्षा निवास्थानी बैठक झाली. या बैठकीत ही रणनिती झाली असल्याची माहिती आहे.

नुकतीच निवडणूक आयोगाकडून (Election Commission) अंधेरी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधननंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी होणार मतदान पार पडणार आहे तर ६ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपसह शिवसेनेने सुद्धा कंबर कसली आहे. (Eknath Shinde News)

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसैनिकांकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला असला, तरी न्यायालयीन लढाईत जिंकण्यासाठी शिंदे गट देखील आपला उमेदवार पुढे करू शकतो.

कारण, एका चिन्हावर दोन उमेदवार दिल्याने पेच निर्माण होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जाईल, अशी शिंदे गटाची रणनीती असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळू नये यासाठी शिंदे गट न्यायालयीन लढाई सुद्धा लढणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षानंतर प्रथमच ही निवडणूक पार पडणार असल्याने या पोटनिवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT