Murbad Politics :  Saam tv
मुंबई/पुणे

Murbad Politics : मविआतील अंतर्गत बंडाळीनं भाजपच्या कथोरेंचा मार्ग सुकर; शरद पवार गटानंतर ठाकरे गटाचाही विरोध

Murbad Assembly constituency News : महाविकास आघाडीतील अंतर्गत बंडाळीने भाजपच्या कथोरेंचा मार्ग सुकर झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Vishal Gangurde

मयुरेश कडव, साम टीव्ही

बदलापूर : विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीत बंडखोरीसहित काही मतदारसंघात नाराजीनाट्य देखील पाहायला मिळत आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीत नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. मुरबाडमध्ये ठाकरे गटाने थेट शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष पवार यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुरबाड मतदारसंघा शिवसेना ठाकरे गटाने अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाचे बदलापूर मुरबाड मतदारसंघात सुभाष पवार हे उमेदवार आहेत. मात्र सुभाष पवार हे बदलापूर शहरातील शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्यांचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

ठाकरे गट नाराज

तसेच शहरात दीपावलीच्या शुभेच्छांसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे,आनंद दिघे यांचे अतिशय लहान फोटो लावण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच बॅनरवरील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटोबद्दल ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उमेदवार सुभाष पवार यांचा आता प्रचार करायचा की नाही, हा निर्णय घेऊ, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. ठाकरे गटाच्या या भूमिकेमुळे बदलापूर मुरबाड मतदारसंघात सुभाष पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

वामन म्हात्रे काय भूमिका घेणार?

दरम्यान, किसन कथोरे यांनी विजयासोबत मताधिक्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. एकीकडे शरद पवार गटाचे माजी शहर प्रमुख शैलेश वडनेरे यांनी सुभाष पवार यांच्याविरोधात बंडांचं निशान फडकवलं आहे. दुसरीकडे ठाकरे गट देखील नाराज असल्याचं समोर आलं आहे. त्याचा थेट फायदा किसन कथोरेंना होईल. असे असले तरी शिंद गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी मात्र अजूनही किसन कथोरेंना साथ दिलेले नाही. त्यामुळे किसन कथोरेंना वामन म्हात्रेंचं आव्हान कायम असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT