Uddhav Thackeray Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Amol Kirtikar: मोठी बातमी! ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला ईडीचे समन्स; राजकीय वर्तुळात खळबळ

Amol Kirtikar ED Summons: लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे.

Satish Daud

Amol Kirtikar ED Summons News

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. मुंबई महापालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, असं या समन्समध्ये नमूद करण्यात आलंय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसं ईडीच्या कारवायाचं सत्र देखील वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील ईडीने अटक केली होती. यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना देखील ईडीने समन्स बजावलंय.  (Lok Sabha Election 2024)

त्यामुळे विरोधक आक्रमक होऊन सत्ताधारी भाजपला धारेवर धरण्याची शक्यता आहे. अमोल कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार आहेत. त्यांची या भागात मोठी ताकद आहे. अशातच त्यांना ईडीचे समन्स आल्याने ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. (Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

राज्यात कोरोनाचं संकट असताना लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. ठाकरे गटाच्या नेत्यांनी हे पॅकेट पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. यात १६० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला होता.

या प्रकरणात माजी मंत्री अनिल परब, माजी मंत्री रविंद्र वायकर यांची देखील चौकशी झाली होती. तर आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देखील चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर सूरज चव्हाण यांना अटकही करण्यात आली होती. आता या प्रकरणात अमोल कीर्तिकर यांना ईडीचे समन्स आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT