bjp  Saam tv
मुंबई/पुणे

भाजपात पक्ष प्रवेशाचा धडाका; शिवसेना ठाकरे गट अन् काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या हाती कमळ

Major Political Shift in Dombivli: कल्याण डोंबिवलीत राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे. जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे आणि माजी नगरसेवक संतोष केने यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

Bhagyashree Kamble

  • कल्याण डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग.

  • शिवसेना ठाकरे गटाला धक्का.

  • भाजप पक्षात बंपर पक्षप्रवेश.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवलीतील स्थानिक राजकारणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे दीपेश म्हात्रे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष केने यांनीही काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.

विशेष म्हणजे या पक्ष प्रवेश दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतलेल्या माजी नगरसेविका पूजा म्हात्रे आणि माजी नगरसेवक दयानंद गायकवाड यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. या भव्य प्रवेश सोहळ्यासाठी डोंबिवलीत मोठा जनसमुदाय उसळला होता. डोंबिवली येथील जिमखाना मैदानावर कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी, आणि दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाला दिला गेलेला अभूतपूर्व प्रतिसाद स्पष्ट जाणवत होता.

या प्रवेश सोहळ्याला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार कपिल पाटील, आमदार शिल्पा गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी आमदार नरेंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दीपेश म्हात्रे हे मागील दोन वर्षांत शिवसेना, शिवसेना (शिंदे गट), त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबठा) गट आणि आता पुन्हा एकदा भाजपात असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मात्र, स्थानिक स्तरावर त्यांचा कार्यकर्त्यांशी असलेला दांडगा संपर्क आणि संघटन शक्ती कायम चर्चेत राहिली आहे.

प्रवेश सोहळ्याप्रसंगी दीपेश म्हात्रे म्हणाले, "डोंबिवलीचा विकास हा माझा एकमेव ध्यास आहे. निर्णय वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, तर काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पक्षासोबत राहण्यासाठी घेतला आहे. भाजपाच्या नेतृत्वासह आम्ही डोंबिवलीत नवे काम आणि नवी ऊर्जा निर्माण करणार आहोत'.

तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, 'डोंबिवलीतील युवा कार्यकर्त्यांमध्ये दीपेशची पकड मजबूत आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाची ताकद आणखी वाढेल. आम्ही सर्वजण मिळून डोंबिवलीचा विकास अधिक जोमाने करू'. तर, 'कपिल पाटील म्हणाले डोंबिवलीच्या राजकारणात नव्या शक्ती समीकरणाची सुरुवात झाली आहे. जनतेच्या विश्वासावर आधारित राजकारण हेच आमचे ध्येय आहे. दीपेश म्हात्रे यांच्या प्रवेशामुळे भाजपाला स्थानिक स्तरावर संघटन आणखी मजबूत करण्याची संधी मिळणार आहे'.

तर, शिवसेना ठाकरे गटाला मात्र हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. दरम्यान, 'आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाचे राजकीय समीकरणावर दूरगामी परिणाम दिसू शकतील. महायुतीचा म्हणजे नक्की कुणाचा महापौर याचा उलगडा इतक्या लवकर करणे योग्य नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक महापौर देणार', असं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

Maharashtra Police Income Tax Investigation: इन्कम टॅक्स विभागानं वाढवलं टेन्शन, थेट 1050 पोलिसांना नोटीस, पोलिस दलात मोठी खळबळ

Maharashtra Live News Update : मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या सुरक्षेत वाढ

Marwadi Garlic Chutney: वरण भातासोबत काहीतरी झणझणीत खावसं वाटतयं? मग मारवाड स्टाईल लसूण चटणी ठरेल बेस्ट

SCROLL FOR NEXT