Sanjay raut, Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : कर्नाटकचे मुख्यमंत्री भूमिका मांडताहेत; CM शिंदेंच्या तोंडाला कुलूप का? संजय राऊतांचा सवाल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक-सीमाप्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात तणावाचं वातारण निर्माण झालं आहे. एकीकडे विरोधकांकडून सीमाप्रश्न तातडीने मिटवण्याची मागणी केली जात असताना, दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्राला डिवचण्याचं काम करत आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष केलं आहे. (Maharashtra-Karnataka Border Dispute)

कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे त्यांची बाजू मांडत आहे. पण आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? ते काहीही का बोलत नाहीत? त्यांच्या तोंडाला कुलुप का?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला यावेळी सीमावादावरून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

काय म्हणाले संजय राऊत?

कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याशी महाराष्ट्राला पडलेला नाही. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मई यांना कशाप्रकारे उत्तर देतात? मुख्यमंत्री या लढ्यात उतरले आहेत की नाहीत कुठे आहेत, हा प्रश्न आहे. कर्नाटकच्या प्रश्नावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) तोंड उघडलेलं नाही. काल देखील आमचे खासदार हे अमित शहा यांना भेटले आहेत. मिंदे सरकारचे खासदार यावरती गप्प बसलेले आहेत, असा घणाघात संजय राऊतांनी केला आहे.

इतकंच नाही तर, 'शिंदे गटाची निशाणी ढाल-तलवार नसून कुलूप असायला हवी. त्याची चावी दिल्लीकडे आहे. दिल्लीवाले जेव्हा कुलूप उघडतील, तेव्हा हे बोलतील. पण त्यांच्यात बोलण्याची हिंमत नाही. काल सुप्रिया सुळेंनी जोरदार भूमिका मांडली. तेव्हा हे सगळे कुठे होते?', असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांनी या सीमावादावर मध्यस्थी करणार असल्याचं म्हटलं. मात्र, त्यानंतर बोम्मई यांनी अमित शहा यांच्या भेटीचा काहीही फायदा होणार नाही असं म्हणत महाराष्ट्राला डिवचलं. यावरून सुद्धा संजय राऊतांनी सवाल उपस्थित केलाय. बोम्मई म्हणतात एक इंचही जमीन देणार नाही, अमित शाह यांचं ऐकणार नाही. मग अमित शाह नेमकी काय मध्यस्थी करणार आहेत?' असं संजय राऊत म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT