Sanjay Raut Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut : संजय राऊत तुरुंगाबाहेर येणार? आज जामीन अर्जावर होणार फैसला

संजय राऊत (Sanjay Raut) हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात गेल्या १०० दिवसांपासून तुरुंगात आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut Latest News : शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी आजचा दिवस खूपच महत्वाचा असणार आहे. कारण, संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल आज न्यायालयाकडून जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांना जेलमध्ये राहणार की बाहेर येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात गेल्या १०० दिवसांपासून तुरुंगात आहे. ईडीने त्यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी राऊत यांच्या जामीन अर्जावर २ नोव्हेंबरला सुनावणी झाली. त्यावेळी राऊत यांची न्यायालयीन कोठडी मुंबईच्या विशेष विशेष पीएमएलए कोर्टाकडून १४ दिवसांनी वाढविण्यात आली होती.

न्यायालयाने २ नोव्हेंबरला घेतलेल्या सुनावणीत राऊतांच्या जामीन अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. आज राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपणार असून न्यायालय या निकालाचे वाचन करणार आहे. त्यामुळे संजय राऊतांना बेल मिळणार की ते पुन्हा जेलमध्ये जाणार याकडे ठाकरे गटाचं लक्ष लागून आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालयाने (ईडी) संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. संजय राऊत आणि त्यांचे बंधू प्रविण राऊत हेच पत्राचाळ प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे ईडीनं लावलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा युक्तिवाद संजय राऊतांच्या वतीनं करण्यात येतोय.

दरम्यान 31 जुलैला अटक झाल्यापासून संजय राऊत हे कोठडीतच आहे. सुरूवातीला ते ईडीच्या कोठडीत होते. मात्र, नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. सध्या त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज या निकालाचे न्यायालयाकडून वाचन केले जाणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT