uddhav thackeray and bmc saam tv
मुंबई/पुणे

BMC Election 2022 : मुंबई महापालिका आपल्याकडेच राहणार, कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

'मुंबई महापालिका आपल्याकडेच राहणार, कामा लागा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Uddhav Thackeray News : राज्यातील २४ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचं देखील आगामी निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज, बुधवारी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत 'मुंबई महापालिका आपल्याकडेच राहणार, कामा लागा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. (Latest Marathi News)

राज्यातील २४ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळं आगामी निवडणुकीसाठी २०११च्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष देखील आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज, बुधवारी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, 'आगामी निवडणुकीसाठीची तयारी करा. राज्यात ज्यांची सत्ता आहे, ते वॉर्ड पुर्नरचना करणारच. त्यांनी ती करू द्या. आपण जिंकण्यासाठी मैदानात उतरू या. मुंबई महापालिका आपल्याकडे राहणार, कामाला लागा'. तसेच सिनेट निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश पक्षप्रमुख ठाकरेंनी दिला आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: देवाभाऊंकडे सर्व काही तरी फोडोफोडी करता; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला|VIDEO

Pune News : व्हेज नूडल्समध्ये सापडले चिकनचे तुकडे, रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या शाकाहारी जोडप्याचा संताप

WhatsApp Privacy: व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटिंग पूर्णपणे खाजगी ठेवायचंय? मग 'ही' सेटिंग लगेच अ‍ॅक्टिव्ह करा

Hair Care: चहाच्या पानांच्या पाण्याने केस धुण्यामुळे होतील 'हे' फायदे

Ladka Bhau Yojana: लाडका भाऊ योजना फेल; राज्यातील तरुणांवर बेरोजगारीची टांगती तलवार|VIDEO

SCROLL FOR NEXT