Sanjay Raut on Seat Sharing  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Sanjay Raut on Seat Sharing Latest Political Updates in Marathi: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना नाव न घेता इशारा दिला आहे.

Satish Daud

UBT Shivsena on Congress: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. ४८ पैकी ३१ जागांवर तिन्ही पक्षाचे खासदार निवडून आले. यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक १४ जागा जिंकल्या. तेव्हापासून महाविकास आघाडीत छोटा भाऊ आणि लहान भाऊ यावरून खटके उडत आहेत. मुख्यमंत्रीपदावरूनही शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मतभेद असल्याचं बोललं जातं आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना नाव न घेता इशारा दिला आहे.

काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा दावा करू नये अजून जागावाटप बाकी आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. इतकंच नाही तर कुणाला मोठा भाऊ आणि लहान भाऊ अशी खुमखुमी असेल तर ती महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत उतरवून दाखवेन, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांच्या या विधानाने महाविकास आघाडीत आणखीच वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे. मुंबईत पत्रकारांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले, "तिसरी आघाडी झाली तर ती केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. कारण ही आघाडी विरोधकांची मत फोडेल. महाविकास आघाडीची आज जागा वाटप बैठक होत आहे. लोकसभेच्या जागावाटपावेळी कोल्हापूरची जिंकलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली. रामटेक अमरावतीची जागाही आम्ही त्यांना सोडली".

"काँग्रेस नेते जर ते विसरत असतील तर हे योग्य नाही. वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका घेणार नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास सर्वांचाच वाढलेला आहे. तीनही पक्षांना एकत्र राहावं लागेल. महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास वाढणार नाही. जर तो आत्मविश्वास वाढला तर अभ्यासाचा विषय आहे. लोकसभा निवडणुकीवेळी जागावाटप करणे सोपे होते. आज आमची सर्वांना सामावून घेण्याची भूमिका आहे".

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, "स्वतः काँग्रेसचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी चेन्नीथला यांचे म्हणणे आहे की महविकास आघाडीत कुणीही मोठा आणि लहान भाऊ कोणी नाही. पण कोणाला लहान मोठा मधला भाऊ अशी खुमकुमी असेल तर ते महाराष्ट्रात लवकरच कळेल. काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. लोकसभेत मोठ्या जागा मिळाल्या त्यामुळे त्यांना मोठे भाऊ, लांब भाऊ वाटले असेल तर त्यांना लक्षात घेतले पाहिजे की त्यांच्या विजयात शिवसेना योगदान मोठे आहे".

संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर देखील टीका केली. मोदी आज महाराष्ट्रात दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत आज वर्ध्यात पी एम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा होत आहे. शहरातील स्वावलंबी मैदानावर हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात आणि रिबीन कापून जातात, उद्योगाचे काय? असा थेट सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : राम शिंदे पराभवाचा वचपा काढणार की रोहित पवार पुन्हा आमदार होणार? एक्झिट पोल काय सांगतो?

Samosa Recipe: नाश्त्यासाठी १० मिनिटांत बनवा हॉटेलसारखा खुसखुशीत समोसा

IND vs AUS: पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियामध्ये मोठा फेरबदल, अचानक 'या' खेळाडूची संघात एन्ट्री!

SCROLL FOR NEXT