Uddhav Thackeray On Shiv sena MLA Disqualification Verdict Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray: सुप्रीम कोर्टात निर्णय टिकणार नाही, निकालानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

Shiv sena MLA Disqualification Verdict: पक्षांतर कसं करावं आणि त्याचा मार्ग कसा आहे, हे त्यांनी आज दाखून दिलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Satish Kengar

Uddhav Thackeray On Shiv sena MLA Disqualification Verdict:

न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत? काय चौकट दिलेली आहे? त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे? अथवा काय चौकशी करायला पाहिजे? हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. ते संपूर्णपणे पायदळी तुडवले. आमच्या मागे महाशक्ती आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा जुमानत नाही, हे आजच्या त्यांच्या (राहुल नार्वेकर) निकालातून दिसून आलं आहे, असं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालानंतर उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सुप्रीम कोर्टात हा निर्णय टिकणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

पत्रकार परिषद घेत त्यांनी नार्वेकर यांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''पक्षांतर कसं करावं आणि त्याचा मार्ग कसा आहे, हे त्यांनी आज दाखून दिलं.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ते म्हणाले, ''त्यांनी (राहुल नार्वेकर) स्वतः दोन-तीन पक्ष बदलली आहेत. यामुळे त्यांनी आज त्यांच्या भावी वाटचालतील अडथळा आज दूर करून घेतला असेल. आज पर्यंत आपण जे मनात आलो आहोत की, सर्वोच्च न्यायालयाचे निकाल अथवा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात, ते एक परिमाण ठरलं जातं.''  (Latest Marathi News)

निकाल आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहे की, ''मूळ राजकीय पक्ष संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेला निर्णय लोकशाहीची हत्या करणारा आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय देशासाठी मोठे संकेत आहेत.

ते पुढे म्हणाले, भाजपाला आपलं संविधान बदलायचे आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेले संविधान भाजपला मान्य नाही, भाजपला स्वतःच संविधान घ्यायचा आहे, ते स्पष्ट झालं अनेक वर्षे राहुल नार्वेकर आमच्या पक्षात होते, तेव्हा ते कुठल्या पक्षप्रमुखाच्या तिकिटावर लढत होते? लोकशाहीमध्ये या सरकारची उलट तपासणी आता जनताच करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT