शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांना शुभेच्छा; चर्चांना उधाण प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

शिवसेनेच्या नेत्यांकडून भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांना शुभेच्छा; चर्चांना उधाण

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा काढली जात आहे. शिवसेना नेत्याकडून बॅनर लावण्यात आल्याने चर्चा रंगू लागली आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा आज काढली जात आहे. प्रथमच आगरी समाजाला केंद्रात मंत्री पद मिळाल्याने भाजप कार्यकर्ते आणि समाजातील नागरिक उत्साही आहेत.या यात्रेसाठी ठिकठिकाणी भाजपकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.तसेच कल्याण-शीळ रोडवर कपिल पाटील यांचे स्वागत आणि शुभेच्छाचे बॅनर लागले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना नेत्याकडून बॅनर लावण्यात आल्याने आता याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, सुपूत्र सुमित भोईर यांचाकडून बॅनरबाजी करण्यात आली. (Shiv Sena leaders congratulate BJP's Union Minister of State)

हे देखील पहा -

केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्र आज काढली जाणार आहे. त्यामुळे भाजप कडून सर्व ठिकाणी बॅनरबाजी केली जात आहे. मात्र शिवसेना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी लावलेल्या या बॅनरवर आता चांगलीच चर्चा रंगली आहे. सुभाष भोईर यांनी विकास कामे करून सुद्धा 2019 सालच्या विधानसभा निवडणूकीत एबी फॉर्म देऊन सुद्धा त्यांचे ऐनवेळी तिकीट कापले आणि रमेश म्हात्रे यांना तिकीट दिले. त्यामुळे भोईर हे शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे. यावेळी शिवसेनेचा पराभव झाला आणि मनसेचा आमदार निवडून आला. तर खासदार आणि भोईर यांच्यात पटत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे भोईर हे भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे हा बॅनर शुभेच्छा देणारा बॅनर आहे की, शिवसेनेच्या माजी आमदारांनी काही राजकीय संकेत दिले आहेत, हे येणाऱ्या काळात उघड होणार आहे.

जन आशीर्वाद यात्राचे पहिला दिवसाचा मार्ग असा असणार

खिडकाळी मंदिर - देसाई नाका - पलावा चौक - काटई नाका - मानपाडेश्वर मंदिर - सोनारपाडा साई मंदिर - डी.एन्.एस्.चौक - भाजपा डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालय - दावडी नाका - विको नाका - टाटा नाका - सूचक नाका - चक्की नाका - तिसाई मंदिर, तिसगांव ते आमदार गणपत गायकवाड यांचे कार्यालय अशा पद्धतीने ५ दिवसीय यात्रेतील पहिला दिवस पार पडणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

Praniti Shinde : भाजपचे आमदार फक्त जीआरवर, अस्तित्वात नाही; खासदार प्रणिती शिंदे यांची आमदार कल्याणशेट्टींवर टीका

SCROLL FOR NEXT