Shiv Sena, Shirish Chavan Death News : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ, निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे पालघरचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष (दादा) जयराम चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पालघर जिल्हा आणि संपूर्ण शिवसेनेत मोठी शोककळा पसरली आहे.
शिरीष चव्हाण यांनी आपल्या राजकीय जीवनात शिवसेनेचे एकनिष्ठ शिलेदार म्हणून काम केले. कठीण काळातही पक्षाशी आणि पक्षाच्या विचारसरणीशी प्रामाणिक राहत त्यांनी पालघर जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. एक अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख पालघरच्या राजकीय वर्तुळात होती. त्यांच्या निधनामुळे पक्षाने एक खंदा आणि जमिनीवरील नेता गमावला असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
शिरीष चव्हाण यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५ वाजता त्यांच्या '१७ शिवराई, महेश पार्क, तुळींज रोड, नालासोवारा (पूर्व)' या निवासस्थानावरून निघणार आहे. या अंत्ययात्रेत आणि अंतिम संस्काराला विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी तसेच त्यांचे हजारो समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
शिरीष चव्हाण यांच्या निधनाची माहिती समजताच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, 'शिवसेनेने एक निष्ठावंत आणि कडवट शिलेदार गमावला आहे', अशी भावना व्यक्त केली. केवळ राजकारणातच नव्हे, तर नालासोपारा आणि पालघर परिसरातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांमध्ये त्यांचा हिरिरीने सहभाग असायचा. सामान्य कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.