Shivsena Dasara Melava 2019 Twitter/@AUThackeray
मुंबई/पुणे

Shivsena Dasara Melava: शिवसेनेचा 'दसरा मेळावा' हायजॅक करण्याची शिंदे गटाकडून तयारी, भाजपही करणार मदत?

Shivsena Dasara Melava 2022: शिवसेनेने यगोदरच दसरा मेळाव्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. मात्र, मुंबई महापालिकेने यासाठी आखडता हात घेतल्याची माहिती आहे.

सूरज सावंत

मुंबई: शिवसेनेसाठी नवसंजीवनी असणारा शिवसेनेचा दसरा मेळावाच (Shivsena Dasara Melava) हायजॅक करण्याच्या प्रयत्न शिंदे गटाकडून (Eknath Shinde) करण्यात येणार आहे. यासाठी शिंदे गटाला भाजपही साथ देत असून पडद्यामागून भाजपच्या जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती सामटीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेने यगोदरच दसरा मेळाव्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे. मात्र, मुंबई महापालिकेने यासाठी आखडता हात घेतल्याची माहिती आहे. शिवसनेला पालिकेने मैदानासाठीची परवानगी नाकारताच शिंदे गटाकडून हे मैदान मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (Shivsena Vs. Eknath Shinde)

हे देखील पाहा -

शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख सभा घेत शिवसैनिकांना आपल्या भाषणातून नवसंजीवनी आणि दिशा देतात. मात्र, यंदाच्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार का? याबाबत संभ्रम आहे. एकेकाळचे निष्ठावंत शिवसैनिक आणि ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार आता शिंदे गटात सामील झाले आहेत, त्यामुळे शिवेसेनेला जोरदार धक्का बसला आहे. या धक्क्यातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करणार आहेत, अनेक दौरे याअगोदरच झाले. याचाच एक भाग म्हणून शिवसैनिकांमध्ये उर्जा भरण्यासाठी यंदाच्या दसरा मेळाव्याचं महत्वं वाढलं आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाल्यास दसरा मेळाव्यात फक्त एकनाथ शिंदे भाषण करणार की फडणवीसही बोलणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचप्रमाणे जर शिवसेनेला परवानगी नाकारली तर शिवसेनेचा दसरा मेळावा कुठे होणार? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

उद्धव ठाकरे आक्रमक

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार, १२ खासदार, शेकडो नगरसेवक हजारो पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आपल्याकडे खेचले आहे. सोबत शिवसेनेचं धनुष्यबाण हे राजकीय चिन्ह, शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय असलेलं शिवसेना भवन, आणि संपूर्ण शिवसेनेवरच दावा ठोकल्याने आता उद्धव ठाकरेही आक्रमक झाले आहेत. ते गणेशोत्सवानंतर राज्यभरात महाप्रबोधन यात्रेचा शुभारंभ करुन शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही सभा घेणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यातल्या टेंभी नाक्याजवळ उद्धव ठाकरे यांची पहिली सभा होणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाची सांगता होताच उद्धव ठाकरे यांच्या 'महाप्रबोधन यात्रे'चा श्रीगणेशा होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

SCROLL FOR NEXT