Pune: शिवसेना शहर उपप्रमुखाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: शिवसेना शहर उपप्रमुखाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे शहरात शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुणे शहरात शिवसेनेचे पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. निखील बाळासाहेब मालुसरे (२८, रा. कमल स्मृती, गाडीखाना मागे, १०५३ शुक्रवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल मालुसरे याने राहत्या घरी दुपारी १२ वाजेच्या सुमारास टेरेसवर गळफास घेऊन केली आत्महत्या केली आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर तातडीने त्याला पुण्यामधील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले आहे. बाळासाहेब मालुसरे यांनी कोव्हीड काळात अनेक सामाजिक कार्ये केली आहेत.

मध्यंतरी शुक्रवार पेठेमध्ये त्यांनी लसीकरण केंद्र देखील सुरु करण्यात आले होते. त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने शहरात राजकीय वर्तुळात प्रचंड मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याचे कारण आणखी कळू शकले नाही. या घटनेविषयी खडक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी

Gold Rate Today : दिवाळीनंतर सोन्याचे भाव धडाधड कोसळले! प्रतितोळा १३१० रूपयांची घसरण, वाचा आजचे ताजे दर

Bribe Case : बड्या अधिकाऱ्याने स्वीकारली लाच, असा अडकला ACB च्या जाळ्यात; नागपूरमध्ये खळबळ

Andheri Gas Cylinder Blast: अंधेरीत गॅस सिलिंडरचा स्फोट, आगीच्या भडक्यात दोन महिलासह १३ वर्षीय मुलगी भाजली

Accident: भयंकर अपघात! ७०० मीटर खोल दरीत कोसळली व्हॅन; १४ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT