CM Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात एकीकडे शिंदे सरकारच्या (Eknath Shinde) मंत्रिमंडळ खातेवाटपाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्षांना पुन्हा पत्र लिहलं आहे. विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समिती संदर्भात हे पत्र लिहण्यात आलं आहे. समितीवर सुनील प्रभू, अजय चौधरींची नेमणूक करा. या आशयाचं पत्र उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहलं आहे. (Shivsena Uddhav Thackeray Latest News)

राज्यात नवं सरकार स्थापन झालं तेव्हापासून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अनेकदा विविध मुद्द्यांवरून आमने-सामने आलेला आहे. सत्तासंघर्षाचा हा वाद आता सुप्रीम कोर्टातही पोहचला आहे. खरी शिवसेना आपली असा दावा दोन्ही गटाकडून केला जातोय. अशातच विधानपरिषदेत शिंदे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. कामकाज सल्लागार समितीत ठाकरे गटाचा समावेश करण्यात आला आहे. (CM Eknath Shinde Latest News)

विधानपरिषदेत शिंदे गट अस्तित्वातच नाहीये. यामुळे तिथे ठाकरे गटाचा समावेश करण्यात आला आहे. कामकाज समितीत ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि अनिल परब यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, आता विधानसभा कामकाज समितीत सुनील प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक करा अशा आशयाचं पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT