कल्याण पूर्वेत पुन्हा शिवसेना-भाजप आमने-सामने प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कल्याण पूर्वेत पुन्हा शिवसेना-भाजप आमने-सामने

‘ईव्हीएम’ हॅक करून भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे निवडून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या प्रकरणात शिवसेनेने उडी घेतली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण पूर्वेत शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने आली आहे. कारण आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओचे. ‘ईव्हीएम’ हॅक करून भाजपचे आमदार गणपत गायकवाड हे निवडून आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार आधीच नोंदवली आहे. आता या प्रकरणात शिवसेनेने उडी घेतली असून, याबाबत चौकशी झाली पाहिजे, गायकवाड यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे केली आहे. तर व्हिडिओ व्हायरल होताच मी स्वत:हून पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांत गुन्हाही दाखल झाला आहे. विरोधकांनी मला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. यापूर्वीही मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता असे गणपत गायकवाड यांचे म्हणणे आहे.

हे देखील पहा -

ईव्हीएम हॅक करून गायकवाड हे निवडून आल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे कल्याणमधील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावाही करण्यात आला असला तरी हा जाणून-बुजून केल्याची चर्चा आहे. दरम्यान, ‘स्टिंग’मधील आशिष चौधरी आरोपी असून याने गायकवाड यांच्या मुलाची ४० लाखांची फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते आणि आशिष चौधरी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची त्यांच्याच सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन संबंधित तरुणाला अटकही करण्यात आली. त्यानंतर गणपत गायकवाड यांच्याशी संबंधित आणखी एक नवं प्रकरण उभं राहिलं आहे. ते म्हणजे एका व्हायरल व्हिडीओचं. हा व्हिडीओ हे स्टिंग केल्याचा दावा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे आमदारांच्या मुलाची फसवणूक करणाऱ्या तरुणाचं हे स्टिंग असून आमदार ईव्हीएम हॅक करुन मतदानात निवडून आल्याचा दावा या व्हिडीओत सदर तरुण करताना दिसतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. मात्र या व्हिडिओमध्ये कितपत सत्यता आहे हे तपासांती स्पष्ट होणार आहे.

आता प्रकरणात शिवसेनेने उडी घेतली असून, याबाबत चौकशी झाली पाहिजे, गायकवाड यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेत शिवसेना-भाजप पुन्हा आमने-सामने आल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

SCROLL FOR NEXT