Pune : पुण्यात शिवसैनिकांनी लावले थेट 'सामना'मधील अग्रलेखाचे होर्डिंग गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात शिवसैनिकांनी लावले थेट 'सामना'मधील अग्रलेखाचे होर्डिंग

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर 'मस्त आणि महामस्त' या मथळ्याखाली अतिशय बोचरी टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यातील खडकी परिसरात दैनिक सामनामध्ये आलेल्या अग्रलेखाची अक्षरशः होर्डिंग लावण्यात आली आहे. शिवसेनेचे उप शहरप्रमुख प्रशांत राणे यांनी खडकी बाजार परिसरात ही होर्डिंग लावली आहे. शिवसेना आणि भाजप (Shivsena and BJP) हा वाद आता महाराष्ट्राला नवा नाही मात्र आता तर पुण्यातील शिवसैनिकांनी थेट अग्रलेखाचंच होर्डिंग लावूनच भाजपच्या वरिष्ठांवरती राऊतांनी ओढलेले ताशेरे वाचण्यासाठी हा नवीनच पाय़डा पाडला जातोय की काय ? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.

शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर 'मस्त आणि महामस्त' या मथळ्याखाली अतिशय बोचरी टीका करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

सामनाच्या (Samna) अग्रलेखातून अमित शहा आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा चांगलाच खरपूस समाचार घेण्यात आला आहे. त्यामुळे हा अग्रलेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने प्रशांत राणे यांनी खडकी बाजार परिसरामध्ये सामनाच्या अग्रलेखातची होर्डिंग लावली आहे. त्यामुळे या होर्डिंगची चांगलीच चर्चा सध्या सुरु आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League 2026: नॉर्थ मुंबई पँथर्स ‘अजिंक्य’च; ईगल ठाणे स्ट्रायकर्सवरचा पराभव करत मिळवला सलग चौथा विजय

सासूच्या सौंदर्यावर जावई फिदा, दोघांनी घरातून पळून जाऊन थाटला संसार अन्...

Maharashtra News Live Update: बार्शी - सोलापूर मार्गांवर दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात

डोळ्यांच्या 'या' बदलाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, असू शकतं मोठ्या आजाराचं संकेत

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! हे आयडी लगेचच तयार करा, अन्यथा पीएम किसान योजनेचा हप्ता विसरा

SCROLL FOR NEXT